किंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील ताज्या बातम्या, महत्त्वाच्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी सह जोडलेले रहा...

28 Sept, 05:28 (IST)

राजस्थान रॉयल विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात सामना आज पार पडला. या सामन्यात राजस्थानच्या संघाचा 4 विकेट्सने विजय झाला. मात्र, पंजाबच्या संघासाठी आक्रमक खेळी करणारा मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली आहे. ट्विट-

 

28 Sept, 04:49 (IST)

आयपीएलच्या आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स ने किंग्स इलेव्हन पंंजाब च्या हातातील सामना वळवुन 4 विकटने विजय मिळवला आहे.

28 Sept, 04:31 (IST)

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंंदा तुळजापुरच्या तुळजाभवानी मंंदिरातील नवरात्र उत्सव रद्द करण्यात आला आहे. 

28 Sept, 04:18 (IST)

दिल्लीच्या शाहीन बाग परिसरात नोकरीच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार करणार्‍या 32 वर्षीय इसमाला अटक करण्यात आली आहे.

28 Sept, 03:57 (IST)

पुणे शहरात कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांंची संख्या 17,587 वर पोहचली आहे, आजच्या दिवसात, 1548 नवे कोरोना रुग्ण आढळुन आले असुन एकुण बाधितांंची संख्या 1,42, 136 वर पोहचली आहे. आज 1599 जणांंना डिस्चार्ज देण्यात आला असुन 41 मृत्यु झाले आहेत.

 

28 Sept, 03:32 (IST)

पालघर मध्ये वाळू माफियांवरील कारवाईत पोलिसांनी खनिवाडे येथील वैतरणा व तानसा नद्यांजवळील 150 बोटी, एक जेसीबी मशीन, 102 सक्शन पंप व इतर उपकरणांचा समावेश असलेला 7,90,00,350 रुपयांंचा माल जप्त केला आहे, यासंदर्भात विरार पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

28 Sept, 03:24 (IST)

गोव्यात आजच्या दिवसात 384 नवे कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत, 10 जणांंचा मृत्यु झाला आहे, 701 जणांंची रिकव्हरी झाली आहे. यानुसार गोवा राज्यातील एकुण कोरोनाबाधितांंची संख्या 31,958 वर पोहचली आहे, आजवर 26,460 रिकव्हरी झाल्या आहेत तर मृतांंचा आकडा 401 इतका आहे. गोव्यात सध्या कोरोनाचे 5097 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

28 Sept, 03:17 (IST)

आसाम मधील पुरात तब्बल 9 जिल्ह्यातील 2. 25 लाख लोक प्रभावित झाले आहेत तर 10 हजार हेक्टर वरील पिकं पाण्याखाली गेली आहेत.

28 Sept, 03:12 (IST)

झारखंंड मध्ये आज 974 कोरोनाबाधित आढळले असुन एकुण रुग्णांंची संख्या 79,909 वर पोहचली आहे. आजच्या दिवसातील 9 मृत्युंसह आजवरच्या मृतांंचा आकडा 679 वर गेला आहे तर आज डिस्चार्ज मिळालेल्या 958 जणांंसह एकुण कोरोना रिकव्हर झालेल्यांंचा आकडा 66,797 इतका झाला आहे. झारखंंड मध्ये आता 12,433 कोरोना अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

28 Sept, 02:33 (IST)

उत्तर दिल्लीतील अलीपूर भागात उपनिरीक्षकाकडून मैत्रिणीवर गोळीबार करण्यात आला आहे. पीडितेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

28 Sept, 02:13 (IST)

हरियाणामध्ये आज 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 1,307 इतकी झाली आहे.

28 Sept, 02:08 (IST)

दिल्लीत आज 3292 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. याशिवाय 3739 जणांनी कोरोनावर मात केली. तसेच दिवसभरात 42 जणांचा मृत्यू झाला.

28 Sept, 02:02 (IST)

मुंबईत 2,261 नवे कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले असून 44 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय सध्या शहरात 26,593 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

28 Sept, 01:57 (IST)

महाराष्ट्रात आज 18,056 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून 380 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय आज 13,565 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

28 Sept, 01:45 (IST)

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जम्मू-काश्मीरच्या अधिकृत भाषा विधेयकालादेखील मान्यता दिली आहे.

 

 

28 Sept, 01:27 (IST)

उत्तर प्रदेशमध्ये आज 4,403 नवे कोरोना रुग्ण सापडले असून राज्यातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 3.87 इतकी झाली आहे.

 

28 Sept, 01:18 (IST)

कोरोना महासंकटाच्या पार्श्वभूमीवर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशात पेंढा जाळणे थांबवा, अशी सूचना दिल्ली उच्च न्यायालयाने दिली आहे.

 

28 Sept, 24:47 (IST)

मणिपूरमध्ये आज 248  नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून 195 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

 

28 Sept, 24:40 (IST)

जम्मू-काश्मीरमध्ये आज 1,141 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय 1,365 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

 

28 Sept, 24:22 (IST)

संसदेने मंजूर केलेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी करण्यात येणार नाही. यासाठी शिवसेनाही आमच्या सोबत आहे. आम्ही एकत्र बसून धोरण ठरवू, असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. 

Read more


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेला संबोधित करणार आहेत. आज सकाळी 11 वाजता या रेडिओ प्रोग्रॅमद्वारे पंतप्रधान जनतेशी संवाद साधतील. 'मन की बात' हा रेडिओ प्रोग्रॅम ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनवर वर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होतो. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी लेटेस्ट घडामोडी, समस्या यासंदर्भात जनतेशी संवाद साधतात. कोरोना व्हायरस संकटासोबतच सध्याच्या घडीला देशात अनेक समस्या आहेत. त्यापैकी आज नेमकं मोदी कशावर बोलणार, याकडे संपूर्ण देशवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

सध्या सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा शोध सुरु आहे. या प्रकरणाचा ड्रग्सच्या दिशेने सुरु असलेल्या तपासाअंतर्गत अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर यांचा काल एनसीबी चौकशी पार पडली. या चौकशीत या तिन्ही अभिनेत्रींनी दिलेल्या जबाबानंतर आता पुढील तपास नेमकं काय वळण घेणार, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

दरम्यान, काल शिवसेना खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गुप्त भेटीमुळे राज्यात राजकीय भुकंप येणार का? जुने मित्र पुन्हा एकत्र येणार का? महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या भेटीमुळे हे भेट झाली का? अशा चर्चा समाजमाध्यमांमध्ये रंगल्या होत्या. मात्र थोडक्याच वेळात भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत ही भेट सामनाच्या मुलाखतीसाठी झाली असल्याचे सांगितले.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

कोरोना व्हायरसचे संकट देशात कायम आहे. त्यावर लस किंवा औषध उपलब्ध होत नाही. तोपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे अत्यंत जिकरीचे काम आहे. त्यामुळे लसीच्या विकासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, जगात अनेक लसी विकासाच्या विविध टप्प्यात पोहचल्या आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement