'राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा ' उद्यापासून सुरु; खासदार सुप्रिया सुळे यांचे ट्विट; 27 जानेवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
आजच्या दिवसभरातील ताज्या बातम्या, महत्त्वाच्या घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी सह जोडलेले रहा...
आदरणीय शरद पवार साहेबांचा विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील 'राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा ' उद्यापासून (दि.२८ जानेवारी) सुरु करीत आहेत, असे ट्विट राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. ट्विट-
हरियाणाच्या पलवल जिल्ह्यात ट्रॅक्टर परेड दरम्यान जबरदस्तीने दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या जवळजवळ 2 हजार अज्ञात आंदोलकांवर, धोकादायकपणे ड्रायव्हिंगसह इतर कारणांमुळे गुन्हा दाखल झाला आहे.
काल दिल्लीत जे काही घडले त्यास आम्ही पाठिंबा देत नाही. सरकार संवेदनशील असते तर 26 जानेवारी रोजी दिल्लीतील हिंसाचार घडला नसता. यामुळे काही लोक फायदा घेत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे मत व्यक्त केले आहे.
काल झालेल्या हिंसाचारानंतर शेतकरी संघटनांनी आंदोलन संपवणे ही चांगली गोष्ट नाही. काल झालेल्या हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलनाला मोठा धक्का बसला आहे. आम्ही आत्मचिंतन करू. आता आपण लोकांना पुन्हा एकत्रित केले पाहिजे. काल झालेल्या घटनेची आम्ही नैतिक जबाबदारी घेतली आहे. शेतकरी नेते दर्शन पाल सिंह यांनी हे मत व्यक्त केले आहे.
मुंबई: ईडीने ओंकार रीएल्टर्स आणि डेव्हलपर्स प्रा.लि.चे अध्यक्ष कमल किशोर गुप्ता आणि व्यवस्थापकीय संचालक बाबूलाल वर्मा यांना अटक केली. 22,000 कोटींच्या कथित एसआरए विकास घोटाळा आणि येस बँक एक्सपोजर प्रकरणात त्यांना अटक झाली आहे.
200 कोटी रुपयांहून अधिकच्या मनी लाँडरिंग प्रकरणात अटक झाल्यानंतर मुंबई कोर्टाने येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांना 30 जानेवारी पर्यंत ईडी कोठडीत पाठवले.
केंद्रीय गृह मंत्रालयाने 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान, पाळत ठेवणे, नियंत्रण ठेवणे आणि खबरदारी यासाठी मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याचे आदेश दिले आहेत.
देशातील केरळ, हरियाणा, मध्य प्रदेश,देशातील केरळ, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ, उत्तराखंड, गुजरात, उत्तर प्रदेश आणि पंजाब राज्यात बर्ड फ्लू चा प्रादुर्भाव झाल्याची माहिती समोर आली आहे.
दिशा वेगळी असलेल्या कोणाहीसोबत आम्ही आंदोलन पुढे नेऊ शकत नाही. अशांना माझ्या शुभेच्छा. पण मी व्हीएम सिंह आणि अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती आंदोलनातून माघार घेत आहोत. असे अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे व्हीएम सिंह यांनी स्पष्ट केले.
दिल्ली पोलिसांच्या FIR मध्ये आंदोलक शेतकऱ्यांची नावं नमूद करण्यात आली आहेत. शेतकरी ट्रॅक्टर रॅलीसंदर्भात जारी करण्यात आलेल्या एनओसीचा भंग केल्याबद्दल शेतकरी नेते दर्शन पाल, राजिंदरसिंग, बलबीरसिंग राजेवाल, बूटासिंग बुर्जगिल आणि जोगिंदरसिंग उग्राहा यांच्या नावांचा उल्लेख FIR मध्ये आहे. एफआयआरमध्ये बीकेयू स्पॉक्स राकेश टिकैत यांचे नावही आहेः दिल्ली पोलिस
कृषी कायद्याविरुद्ध मागील 2 महिन्यांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शांततेत सुरु असलेल्या या आंदोलनाला काल हिंसक वळण लागले. शेतकरी ट्रॅक्टर रॅली दरम्यान पोलीस आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये हिंसक चकमक झाली. यात बसेसची तोडफोड झाली तर काही पोलिस जखमी झाले. याप्रकरणी 15 एफआयआर नोंदविण्यात आल्या आहेत. तर पूर्व रेंजमध्ये 5 एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत, अशी माहिती दिल्ली पोलिसा सुत्रांनी दिली आहे.
दरम्यान, लाल किल्ला मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. तर जामा मशिद मेट्रो स्टेशनही बंद करण्यात आले आहे, अशी माहिती दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दिली आहे. दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
राज्यात मार्च महिन्यापासून बंद असलेल्या शाळा आज पुन्हा सुरु होणार आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मागील 10 महिने विद्यार्थ्यांनी ऑनलाईन माध्यमातून शिक्षण घेतले. त्यानंतर इयत्ता 9 वी ते 12 वी चे वर्ग सुरु केल्यानंतर आता इयत्ता 5 वी ते 8 वी चे वर्ग सुरु आजपासून सुरु करण्यात येणार आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)