Coronavirus: भारत आणि रशिया यांच्यात Sputnik V vaccine संदर्भात चर्चा सुरु, केंद्र सरकारची माहिती; 25 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

26 Aug, 05:12 (IST)
रशिया द्वारा विकसित करण्यात आलेली कोविड 19 म्हणजेच कोरोना व्हायरस नियंत्रक लस स्पुतनिक व्ही (Sputnik V Vaccine) संदर्भात चर्चा सुरु आहे. केंद्र सरकारने माहिती देताना मंगळवारी (25 ऑगस्ट) सांगितले की, उभय देशांमध्ये प्राथमिक चर्चा सुरु आहे. दोन्ही देशांनी एकमेकांना काही प्राथमिक माहिती सादर केली आहे.
26 Aug, 04:51 (IST)

काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनया गांधी उद्या काँग्रेस शासीत आणि काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडी शासीत राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत नीट, जेईई परीक्षा आणि जीएसटीबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीला काँग्रेस महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, पंजाब, राजस्थान तसेच इतरही राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार असल्याचे समजते.

26 Aug, 04:20 (IST)

मुंबई पोलिसांच्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमने (SIT) ठाणे येथून सोशल मीडिया मार्केटींग इन्फ्लुएन्सर्स फ्रॉडप्रकरणी 45 वर्षांच्या व्यक्तीस अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

26 Aug, 04:00 (IST)

रायगड जिल्ह्यातील महाड येथे इमारत कोसळण्याच्या घटनेतील मृतांचा आकडा 13 (6 पुरुष आणि 7 महिला) वर पोहोचला आहे. अद्याप बचावकार्य सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

26 Aug, 03:17 (IST)

JEE (MAIN), NEET (UG) साठी नवीन तारखा जाहीर झाल्या आहेत. जेईई (मेन) 1 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर 2020 दरम्यान होणार आहे, तर 13 सप्टेंबर 2020 रोजी नीट (यूजी) होणार आहे.

26 Aug, 03:03 (IST)

इंग्लंडचा जेम्स अँडरसन 600 कसोटी विकेट्स गाठणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने याबाबत माहिती दिली.

26 Aug, 03:01 (IST)

पंजाब नॅशनल बँकेने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेकडून नीरव मोदी प्रकरणातील वसुलीचा पहिला भाग म्हणून 3.25 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 24.33 कोटी रुपये मिळाले आहेत. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

26 Aug, 02:33 (IST)

मुंबईत मागील 24 तासांत 587 नवे रुग्ण आढळले असून 35 रुग्ण दगावल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. यामुळे मुंबईत कोरोना बाधितांची एकूण संख्या 1,37,678 वर पोहोचली आहे.

26 Aug, 02:13 (IST)

महाराष्ट्र आरोग्य विभागाने दिलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, महाराष्ट्रात मागील 24 तासांत 10,425 रुग्ण आढळले असून 329 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 7,03,823 वर पोहोचली आहे.

26 Aug, 01:52 (IST)

नवी दिल्लीत 1544 नव्या रुग्णांसह दिल्लीत कोरोना बाधितांची एकूण संख्या 1,64,071 वर पोहोचली आहे. तर सद्य घडीला नवी दिल्लीत 11,998 रुग्णांवर उपचार सुरु आहेत अशी माहिती दिल्ली सरकारने दिली आहे.

26 Aug, 01:08 (IST)

उत्तराखंडच्या टिहरी गढवाल भागात आज संध्याकाळी 6.18 मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसल्याची माहीती भूंकपविज्ञान केंद्राने दिली आहे. या भूकंपाची तीव्रता 3.4 रिश्टेर स्केल इतकी होती.

25 Aug, 23:50 (IST)

तमिळनाडूत 5951 नव्या रुग्णांसह राज्यात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 3,91,303 वर पोहोचली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. तर आतापर्यंत 6,721 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे.

25 Aug, 23:00 (IST)

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी तपास करत असलेल्या CBI टीम ने मुंबई पोलिस दलातील या प्रकरणाचा तपास करणारे भूषण बेलनेकर आणि ब्रांदा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षकांना समन्स बजावले आहे.

25 Aug, 23:00 (IST)

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी तपास करत असलेल्या CBI टीम ने मुंबई पोलिस दलातील या प्रकरणाचा तपास करणारे भूषण बेलनेकर आणि ब्रांदा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षकांना समन्स बजावले आहे.

25 Aug, 22:28 (IST)

NIA कडून पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील मसूद अझर अल्वी आणि इतर 18 जणांविरूद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

25 Aug, 22:07 (IST)

रायगड इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 10 वर पोहोचला आहे.

 

25 Aug, 22:03 (IST)

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडून महाड येथील इमारत दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. महाड येथे इमारत कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली.या घटनेत मरण पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.काहीजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ते लवकर बरे व्हावेत हीच सदिच्छा, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

 

 

25 Aug, 21:52 (IST)

पट्रोल दरवाढीवर राहुल गांधी यांनी खोचक ट्विट केलं आहे.

 

25 Aug, 21:49 (IST)

रायगड इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या 9 वर पोहोचली आहे.

 

25 Aug, 21:20 (IST)

रायगड इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 7 वर पोहोचली आहे.

 

Read more


भारतातील कोरोना व्हायरसचं संकट अधिक गडद होत चाललं आहे. देशात सध्या 30 लाखांहून अधिक जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. तसेच महाराष्ट्रातदेखील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतचं आहे. सोमवारी राज्यात 11,015 नवे रुग्ण आढळले असून 212 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात कोरोना बाधितांची (COVID-19 Positive) एकूण संख्या 6,93,398 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे भारतात कोरोना रुग्ण वाढत असले, तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील वाढत आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेस पक्षातील आपआपसातील वाद राजकीय चर्चेचा विषय बनले आहेत. काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार असं वाटत होतं. परंतु, सध्या 4 ते 5 महिने तरी सोनिया गांधीचं हंगामी अध्यक्ष राहणार आहेत. मात्र, 23 नेत्यांनी लिहिलेल्या पत्रावरुन काँग्रेस नेतृत्वाने नाराजी व्यक्त केली आहे. पत्रातून सोनिया गांधींच्या नेतृत्वावर सवाल उपस्थित केल्यानंतर राज्यातील काँग्रेसमधीलं अंतर्गत राजकारण ढवळून निघालं आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

राज्यात कोरोना विषाणूचं सावट असतानाचं विविध ठिकाणी नैसर्गित संकट येत आहेत. सोमवारी रायगड जिल्ह्यातील महाड शहरात एक भीषण इमारत दुर्घटना घडली. येथील 5 मजली इमारत जमीनदोस्त झाली. यात 41 कुटुंब राहत होते. आतापर्यंत यात अडकलेल्या 60 जणांना बाहेर काढलं असून आतापर्यंत या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी ऑपरेशन सुरु आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now