उद्यापासून मॉल सोडून अन्य दुकाने 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु होणार पण कोरोनाचे हॉटस्पॉट, कन्टेमेंट झोनमध्ये परवानगी नाही ; 24 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
उद्यापासून मॉल सोडून अन्य दुकाने 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु होणार आहेत. मात्र कन्टेंमेंट झोन आणि कोरोनाचे हॉटस्पॉट यांना याममधून वगळण्यात आले आहे.
मुंबईतील NIA मधील एका सब-इन्स्पेक्टरची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे या सब-इन्स्पेक्टरच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना स्वत:हून क्वारंटाइन करावे असा सल्ला देण्यात आला आहे. तसेच या संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे.
मुस्लिम बांधवाना पवित्र रमजान महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. अशी प्रार्थना करतो की आपण सर्व बांधव येणारी ईद कोरोनामुक्त मोकळ्या वातावरण मध्ये साजरी करू असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात केशरी राशन कार्ड धारकांना सरकारचा दिलासा, 8 रुपये प्रति किलोने 3 किलो गहू तर 12 रुपये किलोने 2 किलो तांदूळ देणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे राज्यातील तब्बल 3 कोटी नागरिकांना याचा फायदा होणार आहे.
महाराष्ट्रात आज 394 नवीन कोरोना व्हायरस रुग्ण आणि 18 मृत्यूची नोंद झाली असून राज्यात एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 6817 आणि मृत्यूची संख्या 310 झाली आहे. आजपर्यंत एकूण 957 रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे.
भारतातल्या काल काही ठिकाणी चंद दिसला आहे, त्यानुसार आजपासून रमजानचा पाक महिना सुरु होत आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबईत आज 357 नवीन कोरोना व्हायरस रुग्णांची आणि 11 मृत्यूची नोंद झाली असून, एकूण रुग्णांची संख्या 4589 आणि एकूण मृत्यूंची संख्या 179 झाली आहे.सध्या शहरात 3815 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उबरने शुक्रवारी महाराष्ट्र सरकारला आपत्कालीन सेवांसाठी एक कोटी रुपयांच्या मोफत राईड्सद्वारे मदतीची घोषणा केली. ही सेवा आरोग्य सेवेचे कर्मचारी, कोरोना व्हायरस संबंधित कर्मचारी आणि या व्हायरस बाबत निगडीत कामावर असलेल्या लोकांसाठी असणार आहे.
बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार मुंबईच्या धारावी येथे आज कोरोना विषाणूचे 6 नवीन रुग्ण आढळले आहेत. धारावीतील एकूण सकारात्मक रुग्णांची संख्या आता 220 झाली आहे आहे. यामध्ये 14 मृत्यूंचा समावेश आहे.
गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 1752 रुग्णांची आणि 37 मृत्यूंची नोंद झाली आहे. अशा प्रकारे देशातील एकूण संक्रमितांची संख्या 23,452 झाली आहे. सध्या देशातील रिकव्हरी रेट हा 20.57 टक्के इतका आहे.
आरोपी विनय दुबे याच्या पोलिस कोठडीत 28 एप्रिलपर्यंत वाढ देण्यात आली आहे. 14 एप्रिल रोजी वांद्रे येथे जमलेल्या गर्दी संदर्भात त्याला अटक करण्यात आली होती.
लॉकडाऊन नसते तर आतापर्यंत देशात कोरोना व्हायरसचे अंदाजे 1 लाख रुग्ण असते. लॉक डाऊनमुळे सध्या भारतातील परिस्थितीत नियंत्रणात आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात सुमारे 9.45 लाख संशयित कोरोना व्हायरस रुग्णांवर नजर ठेवली जत आहे.
जेव्हा संपूर्ण देश कोरोना व्हायरसच्या विरूद्ध लढाई लढत आहे, तेव्हा कॉंग्रेस केवळ केंद्र सरकारविरूद्ध लढत आहे. कॉंग्रेसच्या या वर्तनावर कधीतरी दिवशी प्रश्न विचारला जाईल आणि मग त्यांना ते स्पष्ट करावे लागेल अशा शब्दात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.
कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट दिवसागणिक वाढतच असताना आता एक अत्यंत दिलासादायक वृत्त समोर येत आहे, कोरोना व्हायरसच्या विळख्यातून आणखीन एक राज्याची सुटका झाली आहे. हे राज्य म्हणजे त्रिपुरा (Tripura) . मुख्यमंत्री बिपलब कुमार देब (Biplab Kumar Deb) यांच्या माहितीनुसार, कोरोनाचे दोन रुग्ण या राज्यात होते, त्यापैकी पहिला रुग्ण हा काही दिवसांच्या आधीच बरा झाला होता, तर आता दुसऱ्या रुग्णाचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत. यामुळे कोरोनाचे दोन्ही रुग्ण बरे झाल्याने त्रिपुरा राज्य आता कोरोनमुक्त झाले आहे. यापूर्वी गोवा राज्याने कोरोनावर मात केली होती.
दुसरीकडे देशातील कोरोना बाधितांचा आकडा मात्र दिवसेंदिवस वाढतच आहे, गुरुवारी देशात कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) मरण पावलेल्या लोकांची संख्या वाढून 686 झाली आहे, तर एकूण संक्रमितांची संख्या 21700 वर पोहचली आहे. आज देशात 1229 नवीन रुग्ण आणि 34 मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या देशात 16689 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व 4325 लोकांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. तर यामध्ये सर्वाधिक नुकसान झालेल्या महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 778 नव्या रुग्णांसहित 6427 वर पोहचली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 283 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
जागतिक पातळीवर सुद्धा कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत, अमेरिकेत मागील 24 तासात 3000 हुन अधिक मृत्यू झाले आहेत. AFP वृत्त संस्थेच्या माहितीनुसार, नव्या 3, 176 मृतांच्या आकड्यासोबत अमेरिकेतील कोरोना बळींचा आकडा हा 50 हजाराच्या पार गेला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)