मध्य प्रदेश: शिवराज सिंह चौथ्यांदा मुख्यमंत्री पदी; 23 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांना काळजी घेण्यासोबत घरातच बसण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर कोरोनाबाधितांच आकडा दिवसेंदिवस वाढत चालल्याने आपण सध्या फेज 2 मधून जात असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली होती.
मध्य प्रदेशमध्ये ऑपरेशन लोटस यशस्वी झाले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंह यांनी आज मुख्यमंत्री पदाची सुत्र हाती घेतली आहेत. ते चौथ्यांदा मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहेत.
कोरोना व्हायरसचे वाढता प्रादुर्भाव पाहता कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांनी येत्या 1 एप्रिलपर्यंत संपूर्ण राज्य बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांनी या बंदचे काटोकोरपणे पालन करावे अशीही विनंती केली आहे. ट्विट-
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना व्हायरस ग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना चे चित्र पाहायला मिळत आहे. हा आकडा आता 97 वर गेला असून 8 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेने दिले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात संचारबंदी लागू केल्यानंतर मुंबई, पुणे, नाशिकमध्ये खरेदीसाठी लोकांनी गर्दी करायला सुरुवात केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सकाळी लोकांनी लॉकडाऊनकडे पाठ फिरवून रस्त्यांवर गर्दी केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाईलाजास्तव असा निर्णय घेतला. मात्र आता संचारबंदी लागू केल्यामुळे भीतीपायी लोकांनी खरेदीसाठी दुकानांबाहेर गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत असल्याचे प्रसारमाध्यमांकडून सांगण्यात येत आहे.
भारतातील अनेक राज्यांसह केरळमध्येही लॉकडाऊन घोषित करण्याता आला आहे. केरळ राज्य सरकारने याबाबत माहिती दिली असून राज्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्याचे देखील सांगण्यात आले आहे. तसेच केरळ मधील सर्व प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यात आली आहेत.
कोरोना ग्रस्तांसाठी दिवसरात्र एक करून त्यांची सेवा करणा-या बिहार मधील सर्व डॉक्टर आणि वैद्यकिय कर्मचा-यांना 1 महिन्याचा अतिरिक्त मूळ भत्तामिळणार असल्याची मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घोषणा केली आहे.
कोरोनाची परिस्थिती पाहता राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या सुविधा सुरु राहणार आहेत. तसेच मंदिरे, प्रार्थनास्थळ बंद करण्यात आली असून फक्त पुजाऱ्यांना त्यासाठी परवानगी आहे. ईमरजन्सी असल्यास वाहन चालवण्याची नागरिकांना परवानगी असल्याचे ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आल्याचा मोठा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. राज्यातील सर्व सीमा सुद्धा बंद करण्यात येणार आहेत.
देशातील कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहता आज मध्यरात्रीपासून राज्यात आंतरराज्यीय विमान उड्डाणे बंद करण्यात येणार असल्याचा केंद्राने मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोेना व्हायरस नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यासाठी स्वत: पंतप्रधानांनीही काल जनता कर्फ्यूचेआयोजन केले होते. दरम्यान, असे असताना देखील एका पोलीस अधिकाऱ्यांने आपल्या मुलीचे धुमधडाक्यात लग्न लावल्याची धक्कादयक घटना घडली आहे. औरंगाबाद येथील हर्सुल येथे हा धक्कादयक प्रकार घडला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांच्या संपादकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारा संवाद साधला. यावेळी बोलताना पंतप्रधान यांनी कोरोना हे एक आव्हान आहे. ते सर्वांनी मिळून सोडविण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.
मुंबई शहरात घरकाम करणाऱ्या आणखी एका व्यक्तीला कोरोना व्हायरस लागण झाल्याची धक्कादायक वृत्त आहे. ही महिला मुंबईतील एका दाम्पत्याच्या घरात घरकाम करत असे. या घरातील एका व्यक्तीस कोरोना व्हायरसची बाधा झाल्याचे नुकतेच पुढे आले होते.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकार मोठे निर्णय घेण्याची शक्यता असून वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात झाली आहे.
देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांना काळजी घेण्यासोबत घरातच बसण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर कोरोनाबाधितांच आकडा दिवसेंदिवस वाढत चालल्याने आपण सध्या फेज 2 मधून जात असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली होती. त्यामुळे सध्याची परिस्थिती ही गांभीर्याने घेण्यास सांगण्यात आले आहे. तर रविवारी देशभरात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्यानंतर दिल्लीत आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सकाळी 6 ते 31 मार्च पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यापाठोपाठ लखनौ येथे 23 ते 25 मार्च लॉकडाउन, बिहार येथे 31 मार्च पर्यंत लॉकडाउन आणि उत्तर प्रदेशात 23 ते 25 मार्च पर्यंत लॉकडाउनचे आदेश स्थानिक सरकारकडून देण्यात आले आहेत.
दुसऱ्या बाजूला कोरोना व्हायरसमुळे गेल्या 24 तासात युनायडेट स्टेटसमध्ये 100 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त AFP न्यूज ऐजंसी यांच्याकडून देण्यात आली आहे. तसेच अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर डोनाल्ड यांनी त्यांच्याकडील काही माणसे चीनच्या मदतीसाठी पाठवण्यासाठी विचारले असता त्यांनी यासाठी नकार दिला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
तसचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कोरोनाची परिस्थिती असली तरीरी लॉकडाउन करु शकत नाही असे म्हटले आहे. कारण येथील बहुतांश लोक हे प्रत्येक दिवसाच्या रोजगारावर अवलंबून असल्याचे म्हटले आहे. तर महाराष्ट्रात कोरोनामुळे वीज ग्राहकांना आता सरासरी बिल दिले जाणार असल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी निर्णय घेतला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)