GST नोंदणीच्या रजिस्ट्रेशन पूर्वी आता अर्जदाराची पडताळणी केली जाणार ; 23 डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील ताज्या बातम्या. महत्त्वाच्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठीसह संलग्न रहा...

24 Dec, 04:50 (IST)

GST नोंदणीच्या रजिस्ट्रेशन पूर्वी आता अर्जदाराची पडताळणी केली जाणार आहे.

24 Dec, 04:38 (IST)

कर्नाटक येथे कोरोनाचे आणखी 858 रुग्ण आढळून आल्याने आकडा 9.12 लाखांवर पोहचला आहे.

24 Dec, 04:23 (IST)

तेलंगणा: युके येथून आलेल्या एकाही व्यक्तीची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आलेली  नाही.

24 Dec, 04:11 (IST)

लोकप्रिय ब्रिटीश मॉडेल Stella Tennant चे वयाच्या 50 व्या वर्षी निधन झाले आहे. तिचा जन्म 17 डिसेंबर 1970 साली स्कॉटलंडमध्ये झाला होता. 

24 Dec, 03:26 (IST)

ईशान्य फ्रंटियर रेल्वे (NFR) 25 डिसेंबरपासून दार्जिलिंग ते घुम स्टेशन दरम्यान 'टॉय ट्रेन जॉय राइड' सेवा पुन्हा सुरू करणार आहे. या वर्षाच्या मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कोविड-19 साथीच्या आजारामुळे ही सेवा निलंबित करण्यात आली होती.

24 Dec, 03:02 (IST)

CBI कडून ओम प्रकाश शुक्ला यांच्या विरोधात चार्जशीट दाखल करण्यात आले आहे.

24 Dec, 02:53 (IST)

दिल्लीत क्रिसमसच्या सणानिमित्त चर्च मेणबत्त्यांनी उजळले गेले आहे.

24 Dec, 02:37 (IST)

अभिनेते रजनीकांत यांच्या चित्रपटाच्या शूटिंगच्या सेटवरील 4 क्रू मेंबर्सला कोरोनाची लागण झाली आहे.

24 Dec, 02:23 (IST)

पंजाबमधील किसान आंदोलनामुळे पश्चिम रेल्वेच्या अनेक विशेष गाड्यांच्या येण्या-जाण्यावर परिणाम झाला आहे. म्हणूनच काही गाड्यांचे मार्ग वळविण्यात आले आहेत. सुमित ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे यांनी ही माहिती दिली.

24 Dec, 02:03 (IST)

महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 3,913 नवीन रुग्णांची व 93 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज राज्यात 7,620 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील एकूण प्रकरणांची संख्या 19,06,371 झाली असून, आतापर्यंत एकूण 18,01,700 रुग्ण बरे झाले आहेत व मृत्यूची संख्या 48969 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात एकूण 54,573 सक्रीय प्रकरणे आहेत.

24 Dec, 01:33 (IST)

जम्मू-काश्मीर हवाला दहशतवादी फंडिंग प्रकरणी प्रवर्तन संचालनालयाने आज माजी आमदार अंजुम फाजली यांच्या श्रीनगर आणि दिल्ली येथील घरांची झडती घेतली. झडतीदरम्यान एकूण 28,00,700 रुपये जप्त केले.

24 Dec, 24:47 (IST)

लैंगिक छळ प्रकरणात कथित आरोपी असलेले भाजपचे आमदार महेश नेगी यांना उत्तराखंडच्या कोर्टाने 24 डिसेंबर रोजी हजर राहून, डीएनए नमुना देण्याचे आदेश दिले आहेत.

24 Dec, 24:30 (IST)

India-Russia Annual Summit कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे होणार नाही आहे.

24 Dec, 24:21 (IST)

जम्मू-काश्मीरच्या जिल्हा विकास परिषद निवडणुकीत पीएजीडीने 110, भाजपाने 75, अपक्ष 50, कॉंग्रेसने 26, अपनी पार्टीने 12 जागा जिंकल्या आहेत. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

23 Dec, 23:21 (IST)

पुणे खालिस्तान प्रकरणात एनआयएने फरार खलिस्तानी दहशतवादी गुरजीतसिंग निज्जरला दिल्ली विमानतळावर अटक केली आहे. तो सायप्रसमध्ये लपला होता. राष्ट्रीय अन्वेषण एजन्सीने याबाबत माहिती दिली.

23 Dec, 23:02 (IST)

आज दिल्ली विमानतळावर सहा प्रवासी कोरोना विषाणू सकारात्मक असल्याचे आढळले. यामुळे सुमारे 50 प्रवाशांना Institutional Quarantine चा सल्ला देण्यात आला आहे.

23 Dec, 22:34 (IST)

Jammu and Kashmir: गांदरबलच्या दुदरहमा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात तीन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे.

23 Dec, 22:10 (IST)

सेना प्रमुख जनरल एमएम नरवणे यांच्या हस्ते जवानांना मिठाईचे वाटप केले. तसंच त्यांच्याशी संवाद साधला.

23 Dec, 21:43 (IST)

शेतीत नवनवे प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनासाठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांच्या संख्येत वाढ- कृषीमंत्री दादा भूसे

23 Dec, 21:09 (IST)

पश्चिम बंगाल मधील दक्षिणेश्वरपर्यंत मेट्रो ट्रेनची पहिली चाचणी करण्यात आली.

Read more


काल पासून राज्यातील सर्व महापालिकेच्या हद्दीमध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. 5 जानेवारीपर्यंत सुरु राहणाऱ्या या संचारबंदीमध्ये रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत बाहेर फिरण्यास सक्त मनाई आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध ठिकाणी पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. दरम्यान, कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा धोका लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना बाधितांची संख्या कमी होत असल्याचे गेल्या काही दिवसापासून दिसून येत आहे. सध्या 26 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात 10,000 पेक्षा कमी सक्रीय रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. ही संख्या कमी होत असल्याने आणि लसीच्या सकारात्मक विकासामुळे दिलासा मिळत असताना कोरोनाच्या नव्या प्रकाराचा धोका उद्भवला आहे. त्यामुळे Europe आणि Middle East मधून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

आज पहाटे दिल्लीच्या पालममध्ये  8.0℃ तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात तापमान 0.8 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे. सफदरजंग येथे 5.6 टक्के तापमानाची नोंद झाली असून त्यात 1.6 टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now