संपूर्ण भारतात कोरोनाबाधितांची संख्येत वाढ होऊ लागली आहे. छत्तीसगडमध्येही कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. राज्यात आज 557 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 6 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 20 हजार 771 वर पोहचली आहे. एएनआयचे ट्विट-
असाममध्ये आज 1 हजार 272 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 90 हजार 740 वर पोहचली आहे. यापैकी 242 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 67 हजार 641 जणांनी कोरोनावर मात केली आहे. एएनआयचे ट्विट-
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा आणि मुकुल वासनिक यांनी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि संपूर्ण गांधी कुटुंबीयांची माफी मागावी. अन्यथा राज्यातील काँग्रेस कार्यकर्ते त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाहीत, असा थेट इशारा राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिला आहे. काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा आणि गांधी कुटुंबातील व्यक्तीला पक्षाध्यक्ष पद घ्यायचे नसेल तर अन्य व्यक्तीची या पदावर निवड करावी, अशा आशयाचे एक पत्र काही नेत्यांनी काँग्रेस नेतृत्वाला पाठवले आहे. या पत्रावरुन आक्रमक होत, सुनील केदार यांनी ट्विटरद्वारे ही प्रतिक्रिया दिली आहे.
उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन यांची प्रकृती बिघडली असून, ती चिंताजनक आहे. किम जोंग उन कोमात गेले आहेत. त्यांनी त्यांची बहिण किम यो जोंग यांच्याकडे सत्तेची सूत्र सोपवल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
राजस्थानमध्ये आज 1 हजार 345 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, 11 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 70 हजार 609 वर पोहचली आहे. एएनआयचे ट्वीट-
राजस्थानमध्ये आज 1 हजार 345 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, 11 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 70 हजार 609 वर पोहचली आहे. एएनआयचे ट्वीट-
मुंबईत आज 991 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 34 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 36 हजार 348 वर पोहचली आहे. मुंबई महानगरपालिकेचे ट्विट-
सुशांत सिंह राजपूत याच्या निवासस्थानातून सीबीआयसोबत नीरज आणि सिद्धार्थ पिठानी बाहेर पडले आहेत. तर सुशांतच्या मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून आता तपास केला जात आहे.
गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. काल गणेश चतुर्थी दिवशी बाप्पांचे घरोघरी, मंडळात आगमन झाले आहे. आज दुसरा दिवस म्हणजे ऋषीपंचमी. महाराष्ट्रात ऋषीपंचमी निमित्त अनेक महिला उपवास धरतात. पूजा करतात. दरम्यान कोरोनाच्या सावटामुळे यंदाचा गणेशोत्सव अगदी साध्या स्वरुपात साजरा केला जात आहे. सणाला साधे स्वरुप प्राप्त झाले असले तरी गणपती बाप्पाच्या येण्याने सर्वत्र आनंद पसरला आहे.
देशासह राज्यात कोरोना विषाणूंचे संकट कायम आहे. कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. मात्र कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने रिकव्हरी रेट सुधारत आहे. तर मृत्यूदरही कमी झाला आहे. जगातील सर्वात चांगला रिकव्हरी रेट आणि सर्वात कमी मृत्यू दर भारताचा असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
आरोग्य मंत्रालयाने दिले्लया माहितीनुसार, सध्या देशातील कोरोना बाधितांचा आकडा 2,97,5701 वर पोहचला आहे. त्यापैकी 6,97,330 जणांवर सध्या उपचार सुरु असून 2,22,2577 रुग्णंनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर देशातील मृतांचा आकडा 55,794 इतका आहे. दरम्यान देशात अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून जनजीवनाची गाडी हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)