Youngest Mayor in India: 21 वर्षीय Arya Rajendran होऊ शकते तिरुवनंतपुरम ची मेयर; मिळणार सर्वात तरुण महापौर होण्याचा मान

आर्या राजेंद्रन तिरुवनंतपुरम च्या नव्या महापौर झाल्यास त्यांच्या नावावर एक नवीन विक्रमही दाखल होईल.

Arya Rajendran (Photo Credits: Facebook)

केरळ मधील नागरी निवडणुकांच्या निकालानंतर आता मुदावणमुगल (Mudavanmukal) प्रभागातील नगरसवेक आर्या राजेंद्रन (Arya Rajendran) हिचे नाव महापौर पदासाठी पुढे येत आहे. आर्या राजेंद्रन तिरुवनंतपुरम (Thiruvananthapuram) च्या नव्या महापौर झाल्यास त्यांच्या नावावर एक नवीन विक्रमही दाखल होईल. त्यांना देशातील सर्वात तरुण महापौर बनण्याचा मान मिळणार आहे. मुदावणमुगल प्रभागातील नगरसेवक आर्या राजेंद्रन या अवघ्या 21 वर्षांच्या आहेत. इतक्या लहान वयात अद्याप कोणीही महापौर झालेले नाही. त्यामुळे आर्या राजेंद्रन महापौरपदी विराजमान होताच भारतातील सर्वात तरुण महापौर (Youngest Mayor) म्हणून त्यांच्या नावाची नोंद होईल. दरम्यान, तत्कालीन महापौर जमीला श्रीधरन यांच्याकडे महापौर पदाची सुत्रं राहतील, अशी चर्चा होती. परंतु, सीपीएम ने राजेंद्रन यांना हे पद देतील असे दिसून येत आहे.

आर्या राजेंद्रन या ऑल सेंट्स कॉलेजच्या विद्यार्थीनी असून त्या बीएससी (मॅथ्स) च्या अखेरच्या वर्षात शिकत आहेत. त्याचबरोबर त्या एसएफआय राज्य समितीचे सदस्यही आहेत. नगरसेवक आर्या राजेंद्रन या सीपीएम शाखा समितीचे सहकारी सदस्य आहेत आणि बालजनासंघमचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्याच्या वडिलांचे नाव राजेंद्रन असून ते इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतात. तर आई श्रीलता या एलआयसी एजंट आहेत. सीपीएमच्या नेतृत्वाखालील एलडीएफने केरळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जोरदार विजय मिळवला आहे. त्यानंतर दुसर्‍या क्रमांकावर कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ होत्या.

Asianet सोबत बोलताना आर्या राजेंद्रन यांनी सांगितले की, "मी अगदी खुल्या मनाने पदाचा स्वीकार करेन आणि पक्षासाठी खूप चांगले काम करेन. परंतु, अजून सीपीएम कडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही." दरम्यान, तरुणांना आकर्षित करण्यासाठी आर्या राजेंद्रन यांच्याकडे महापौर पदाची सुत्रं देण्याचा सीपीएमचा मानस आहे.

केरळ महानगरपालिका निवडणुकीचा निकाल पाहिला तर 941 ग्रामपंचायतींपैकी 514 आणि 14 जिल्हा पंचायतींमध्ये सर्वात मोठा विजय राज्यातील सत्ताधाऱ्यांचा झाला आहे. ज्यामध्ये 10 जिल्हे त्यांच्या खात्यात आले आहेत. या व्यतिरिक्त, सीपीएमच्या नेतृत्वाखालील एलडीएफने 152 गटांपैकी 108 पंचायत जिंकल्या आहेत. नागरी निवडणुकांमध्ये एनडीएचा वाटा कदाचित जिल्हा पंचायतीतही असू शकणार नाही. परंतु 23 ग्रामपंचायतींवर भाजपाने विजय मिळविला आहे.