Coronavirus Update: देशात 24 तासात 86,961 रुग्णांंसह एकुण कोरोनाबाधितांंचा आकडा 54 लाखावर, अॅक्टिव्ह रुग्णांंचा आकडा सुद्धा 10 लाख पार
देशात मागील 24 तासात 86,961 नवे कोरोना रुग्ण आढळुन आले असुन एकुण संख्या 54,87,581 (Coronavirus Total) वर पोहचली आहे. . यासोबतच आता अॅक्टीव्ह रुग्णांंची संख्या (COVID 19 Active Cases) 10,03,299 वर पोहचली आहे.
Coronavirus Update In India: देशात मागील 24 तासात 86,961 नवे कोरोना रुग्ण आढळुन आले असुन एकुण संख्या 54,87,581 (Coronavirus Total) वर पोहचली आहे. कालच्या दिवसात 1130 मृत्यु झाले असुन एकुण मृतांंची संख्या (Coronavirus Deaths) 87,882 इतकी झाली आहे. देशात आजवर 43,96,399 रुग्ण रिकव्हर (Coronavirus Recovery) झाले आहेत. यासोबतच आता अॅक्टीव्ह रुग्णांंची संख्या (COVID 19 Active Cases) 10,03,299 वर पोहचली आहे. याबाबत केंंद्रीय आरोग्य मंंत्रालयाने माहिती दिलेली आहे. आजच्या अपडेटनुसार, कोरोना व्हायरस रिकव्हरी च्या बाबत एक चांंगली माहिती समोर येतेय. जगभरात कोरोनाच्या रिकव्हरीमध्ये भारत सध्या टॉप ला आहे, भारतात आजवर 43 लाखाहुन अधिक रिकव्हरी झाल्या असुन ही संख्या जागतिक रिकव्हर रुग्णांंच्या संख्येचा 19% भाग आहे.
दुसरीकडे कोरोना चाचण्यांंमध्ये सुद्धा दिवसागणिक मोठी वाढ होत आहे. देशभरात मागील 24 तासात कोरोना चाचणी साठी 7,31,534 स्वॅब नमुने घेण्यात आल्या आहेत यानुसार आजवरच्या चाचण्यांंची संंख्या 6,43,92,594 इतकी झाली आहे. यासंदर्भात आयसीएमआर ने माहिती दिली आहे.
ANI ट्विट
दरम्यान भारतात सध्या कोरोनाच्या 30 संभाव्य लसींंची चाचणी सुरु आहे, याबाबत काल आरोग्यमंंत्री डॉ. हर्षवर्धन यांंनी माहिती देत देशात 3 लसी या क्लिनिकल चाचण्यांंच्या 1,2,3 अशा अॅड्व्हान्स टप्प्यात आहेत तर 4 लसी या प्री क्लिनिकलच्या अॅडव्हान्स टप्प्यात आहेत असे सांंगितले होते.