निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झालेले राजीव कुमार 1 सप्टेंबर रोजी पदाचा कार्यभार स्वीकारतील; 21 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
सेमी हाय-स्पीड ट्रेन सेट (Vande Bharat) च्या 44 सेटच्या निर्मितीच्या निविदा रद्द करण्यात आली आहे. सुधारित सार्वजनिक खरेदी (मेक इन इंडियाला प्राधान्य) च्या आदेशानुसार एका आठवड्यात नवीन निविदा आणल्या जातील, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे.
आदरणीय खा. शरद पवार साहेबांच्या सुचनेनुसार येत्या 31 ऑगस्टपासून जनता दरबार आयोजित केला जाणार आहे. दर गुरुवारी दुपारी 2 ते 4 या वेळेत मुंबई येथील पक्ष कार्यालयात हा दरबार भरेल. भेटताना कृपया सामाजिक अंतर व कोरोनाविषयक नियमांची खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अश्लील टिप्पण्या पोस्ट केल्याप्रकरणी औरंगाबाद शहरातील 26 वर्षीय व्यक्तीला अटक झाल्याची माहिली पोलिसांनी दिली आहे.
श्रीशैलम जलविद्युत संयंत्रात लागलेली आग दुर्दैवी आहे. मी शोकग्रस्त कुटुंबांसमवेत आहेत. जखमींनी लवकरात लवकर बरे होण्याची आशा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज डोंबिवलीत 121 बेड्स असलेल्या COVID-19 हॉस्पिटले ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन केले. हे आजपासून सुरु झाले असून यात अतिदक्षता विभागासह कोविड संबंधी अत्यावश्यक सुविधा ठेवण्यात आल्या आहेत.
मुंबईत (Mumbai) आज सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली असून मुंबईतील अनेक भागात पावसाची संततधार सुरुच आहे. भांडूप (Bhandup), सायन (Sion), माटुंगा (Matunga) येथे सकाळपासूनच पावसाने चांगलाच जोर धरला असून अंधेरी, सांताक्रूज येथे जोरदार पाऊस पडत आहे. दरम्यान मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणारा सर्वात मोठा तानसा तलाव (Tansa Dam) काल संध्याकाळी 7.05 मिनिटांनी ओव्हरफ्लो झाला. यामुळे ही बातमी मुंबईकरांसाठी दिलासादायक आहे अशीच म्हणावी लागेल. यामुळे मुंबईकरांसमोर उभे असलेले पाणीटंचाईचे संकट काहीसे कमी होईल असे म्हणण्यास हरकत नाही.
तर दुसरीकडे दर दिवसा भारतात 9 लाखांहून अधिक कोविड-19 (COVID-19) च्या चाचण्या वाढल्या असल्याचे WHO संस्थेने म्हटले आहे. गेल्या 24 तासांत 9 लाख 18 हजार 470 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे देशातील एकूण चाचण्यांची संख्या 3.25 कोटींपेक्षा जास्त झाली आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे. भारतात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 28,36,926 वर पोहचली असून त्यापैकी 6,86,395 अॅक्टीव्ह रुग्ण (Active Cases) असून 20,96,665 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
तर महाराष्ट्रात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 6,43,289 वर पोहोचली असून 21,359 रुग्णांची कोरोना विरुद्धची झुंज अयशस्वी ठरली आहे. सद्य घडीला राज्यात 1,62,491 रुग्णांवर उपचार सुरु आहे.