2001 Parliament Attack: संसद हल्ल्याला 19 वर्ष पूर्ण; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले शहीदांचे स्मरण (View Tweet)

यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

PM Narendra Modi (Photo Credits: ANI/File)

13 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता. या घटनेला आज 19 वर्ष पूर्ण होत आहेत. 13 डिसेंबर 2001 च्या दुपारी संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असताना जैश-ए-ंमोहम्मद (Jaish-e-Mohammed (JeM) च्या 5 दहशतवाद्यांनी (Terrorists) पूर्ण तयारी सह संसद भवनात घुसले आणि गोळीबाराला सुरुवात केली. अचानक झालेल्या हल्ल्याचा जवानांनी ठामपणे प्रतिकार केला. यात 9 जवान शहीद जाले. मात्र या हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

संसदेवर झालेल्या या हल्ल्याला आज 19 वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मोदींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, "2001 साली या दिवशी संसदेवर झालेला हल्ला आम्ही कधीच विसणार नाही. संसदेचे रक्षण करण्यासाठी आपले प्राण गमावलेल्या जवानांचे शौर्य आणि त्याग आमच्या लक्षात आहे. त्यांच्यासाठी भारत नेहमीच आभारी राहील."

पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट:

राष्ट्रपती रामनाथ कोविंद ट्विट:

या दहशतवादी हल्ल्यात संसद भवन, दिल्ली पोलिस कर्मचारी यांच्यासह एकूण 9 लोक शहीद झाले. यात दिल्ली पोलिस दलातील 5 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नानकचंद, रामपाल, ओमप्रकाश, बिजेंद्र सिंह आणि घनश्याम हे दिल्ली पोलिस दलातील कर्मचारी तसेच केंद्रीय रिझर्व्ह पोलिस दलातील कॉन्स्टेबल कमलेश कुमारी आणि संसद सेवा सुरक्षामधील दोन सुरक्षा साहाय्यक जगदीश प्रसाद यादव आणि मातबर सिंह नेगी हे शहीद झाले होते.