IPL Auction 2025 Live

Goods Train Derail in Bilaspur: छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये कोळशाने भरलेल्या मालगाडीच्या 20 बोगी रुळावरून घसरल्या

या रेल्वे अपघातामुळे प्रवासी रेल्वे सेवा विस्कळीत झाल्या. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बिलासपूर-कटनी विभागातील अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वेच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला.

Goods Train Derailed प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य ANI)

Goods Train Derail in Bilaspur: छत्तीसगड (Chhattisgarh) मधील बिलासपूर (Bilaspur) रेल्वे विभागात कोळशाने भरलेल्या मालगाडीच्या 20 वॅगन्स रुळावरून घसरल्या. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या रेल्वे अपघातामुळे प्रवासी रेल्वे सेवा (Passenger Train Service) विस्कळीत झाल्या. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बिलासपूर-कटनी विभागातील अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वेच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला.

रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने सांगितले की, कोळशाने भरलेली मालगाडी बिलासपूरहून कटनीकडे जात असताना सकाळी 11.11 च्या सुमारास खोंगसारा आणि भंवरटंक रेल्वे स्थानकांदरम्यान 20 वॅगन्स रुळावरून घसरल्या. त्यानंतर बिलासपूरहून अधिका-यांची एक टीम घटनास्थळी पाठवण्यात आली. (हेही वाचा -UP Goods Train Derailed: सहारनपूर, यूपीमध्ये रेल्वे अपघात! मालगाडीचे 2 डबे रुळावरून घसरले, कोणतीही जीवितहानी नाही)

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ट्रॅक मोकळा करून रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या अपघाताचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होईल. या घटनेमुळे पुरी-योग नगरी ऋषिकेश उत्कल एक्स्प्रेस आणि दुर्ग-एमसीटीएम (उधमपूर) एक्स्प्रेससह अनेक प्रवासी गाड्या वळवण्यात आल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.