'प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्याचा निर्णय मागे घ्या' एम के स्टॅलीन यांची केंद्र सरकारकडे मागणी; 2 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील ताज्या बातम्या, महत्त्वाच्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी लेटेस्ली मराठी सह जोडलेले राहा....

03 Sept, 05:28 (IST)

संंसद अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्याचा निर्णय मागे घ्या अशी मागणी डीएमके अध्यक्ष एमक एक स्टॅलीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

03 Sept, 05:05 (IST)

इटलीचे माजी पंतप्रधान सिल्व्हिओ बर्लुस्कोनी यांची कोरोनाव्हायर चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. 83 वर्षीय सिल्व्हिओ बर्लुस्कोनी हे सध्या क्वारंटाईन झाल्याचे वृत्त आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिली आहे.

03 Sept, 04:42 (IST)

देशाचे संरक्षणंत्री राजनाथ सिंह हे तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत. आज ते मॉस्कोला पोहोचले. मॉस्कोतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर संरक्षण मेजर जनरल बुख्तेव युरी निकोलाविच यांनी त्यांचे स्वागत केले: संरक्षणमंत्र्यांचे कार्यालय

03 Sept, 04:05 (IST)

ब्राझीलमधील 3 फुटबॉलपटूंची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. या तिघांमध्ये जगप्रसिद्ध फुटबॉलपटू नेमार (Neymar) याचाही समावेश आहे.

03 Sept, 03:40 (IST)

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कोकण विभागाचा आढावा घेतला. यावेळी कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवासासाठी घातलेले निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे व्यवसायानिमित्त जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची आता केवळ नोंदणी आणि थर्मल तपासणीच होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.

03 Sept, 03:13 (IST)

मिलिंद भारंबे यांची मुंबईच्या गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त  म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, विश्वास नांगरे पाटील यांना मुंबईचे सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) म्हणून नियुक्त केले गेले आहे. एएनआयचे ट्विट- 

 

 

03 Sept, 02:47 (IST)

राज्य सरकारने आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. सराकरच्या आदेशानुसार अमितेश कुमार यांच्याकडे नागपूर तर, बिपीन कुमार सांग यांच्याकडे नवी मुंबई पोलीस आयुक्त पदची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

03 Sept, 02:24 (IST)

महाराष्ट्रात आज कोरोनाचे आणखी 17,433 रुग्ण आढळले तर 292 जणांचा बळी गेला आहे.

03 Sept, 02:16 (IST)

रुग्णालयात श्रीमंत व्यक्ती COVID19 ची लक्षणे नसली तरीही ICU बेड्स व्यापत असल्याची आरोग्यंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. 

03 Sept, 02:06 (IST)

पश्चिम बंगाल येथे कोरोनाचे आणखी 2976 रुग्ण आढळले आहेत.

03 Sept, 01:56 (IST)

पत्रकार पांडुरंग रायकर यांचा उपचारामध्ये काही चूक आहे की नाही त्या संबंधित चौकशी करण्याचे ससून रुग्णालयाच्या अधिष्ठांना पुणे जिल्ह्याप्रशासनाचे आदेश दिले आहेत.

03 Sept, 01:36 (IST)

गुजरात येथे कोरोनाचे आणखी 1305 रुग्ण आढळले तर 12 जणांचा बळी  गेला आहे.

03 Sept, 01:24 (IST)

भारत-चीन सीमेवरील परिस्थितीच्या शांततेने तोडगा काढण्याची आशा करत असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांनी म्हटले आहे.

03 Sept, 24:58 (IST)

आरे जमिनीच्या सुमारे 600 एकर क्षेत्रावर  IFA कलम 4 लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे  आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. 

03 Sept, 24:49 (IST)

पंजाब येथे कोरोनाचे आणखी 1514 रुग्ण आढळले आहेत.

03 Sept, 24:31 (IST)

मुंबईतील धारावीत आज कोरोनाचे 12 रुग्ण आढळल्याने आकडा 2792 वर पोहचल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

03 Sept, 24:19 (IST)

कर्नाटक येथे कोरोनाचे आणखी 9860 रुग्ण आढळले तर 6287 जणांची प्रकृती सुधारली आहे.

02 Sept, 23:56 (IST)

राज्यात सप्टेंबर महिन्यात मेट्रो रेल्वे सेवा सुरु करण्यात येणार नसल्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे.

02 Sept, 23:47 (IST)

ईस्ट मध्य प्रदेशात मध्यम ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

02 Sept, 23:27 (IST)

दिल्लीत आज कोरोनाचे आणखी 2509 रुग्ण आढळले तर 1858 जणांचा डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Read more


नाला सोपारा येथील अकोले भागात काल रात्री एक 4 मजली इमारत कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही इमारत कोसळली तेव्हा ती रिकामी होती. अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.

दरम्यान सध्या संपूर्ण देश कोरोना व्हायरस संकटाशी झुंजत आहे. कोरोना बाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे इतर अनेक प्रश्न सरकारसह नागरिकांसमोर उभे आहेत. कोरोनाच्या सावटाखाली जेईई-नीट परीक्षा होणार आहेत. जेईई मुख्य परीक्षेला देशभरात कालपासून सुरुवात देखील झाली आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

आरोग्य मंत्रालयाच्या काल सकाळच्या अपडेटनुसार, देशातील कोरोना बाधितांचा आकडा 3691167 वर पोहचला आहे. त्यापैकी 2839883 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 785996 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान 65288 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा मोठा आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now