मुंबई येथील धारावी परिसरातून आणखी एक वृत्त पुढे येत आहे. येथील एका 35 वर्षीय व्यक्तीची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे समजते. या घटनेनंतर हा व्यक्ती ज्या ठिकाणी राहातो ती इमारत प्रशासनाकडून क्वारंटाईन करण्यात आली असल्याचे वृत्त प्रसारमाध्यामांनी दिले आहे.
नालासोपारा येथे एका कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तिचा मृत्यू कोरोना व्हायरसमुळेच झाल्याची अद्याप पुष्टी नाही. या व्यक्तिस इतरही काही आजार होते. तो कोरोना व्हायरस पॉझिटीव्ह होता
एम्स रुग्णालयातील एका डॉक्टरची COVID19 चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. या डॉक्टरची पत्नी 9 महिन्यांची गर्भवती आहे. तिचीही चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे दोघांनाही विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या महिलेची प्रसुती रुग्णालयातच केली जाणार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक तत्वं जारी करण्यात आली आहे. देशातील नागरिकांना विदेशी नागरिक आणि कोरोना व्हायरस बाधित रुग्णांपासून दूर ठेवण्यासाठी यात काही गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आबेडकर अनुयायींना अवाहन केले आहे की, 14 एप्रिल रोजी येणारी आंबेडकर जयंती घरात बसून साजरी करा. कोणत्याही स्थितीत आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी गर्दी टाळावी, असेही आठवले यांनी म्हटले आहे.
नवी दिल्लीत कोविड-19 रुग्णांचा आकडा 293 गेला असल्याची माहिती दिल्ली सरकारने दिली आहे. यात निजामुद्दीन येथील 182 कोरोना बाधित पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे.
नागपूर मध्ये कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी कोरोना वॉर रूमची निर्मिती करण्यात आल्याचे पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी TV9 मराठीशी बोलताना सांगितले. त्यामुळे लोकांना यात आपला सहभाग दाखवून घराबाहेर जाणे टाळावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
मुंबईतील सांताक्रूज पश्चिम परिसरातून 35.84 लाखांचे मास्क घेऊन जाणा-या एकाला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली असून आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
महाराष्ट्रात 81 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून त्यातील 57 रुग्ण हे मुंबईतील असल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे. त्यातील 42 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
केरळमध्ये 21 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळल्याची माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली आहे. त्यामुळे सध्या केरळातील कोरोना ग्रस्तांची एकूण संख्या 286 वर गेली असून त्यातील 256 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.
COVID-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील 30 सरकारी रुग्णालये ही कोरोना ग्रस्तांसाठी असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या 30 रुग्णालयात 2305 बेड्सचा समावेश आहे, असे राज्य आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून उद्या सकाळी 9 वाजता देशवासियांना संदेश देणार आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने त्याबाबत माहिती दिली आहे.
नवी दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत कोरोना बाधितांची संख्या 219 झाली असून त्यात 108 निजामुद्दीन येथील लोकांचा समावेश आहे. यातील 2 जणांचा मृत्यू झाला असून नवी दिल्लीत मृतांची एकूण संख्या 4 झाली आहे.
महाराष्ट्रामधून दिल्ली निजामुद्दीन येथील तबलिगी जमातीच्या मकरज कार्यक्रमामध्ये सुमारे 1400 जणांचा समावेश होता. त्यापैकी 1300 जणांचा शोध घेण्यात यश आलं आहे. त्यांना क्वारंटीन करून स्वॅप टेस्ट घेण्यात आल्या आहेत. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
मुंबईच्या धारावीमध्ये कोरोना व्हायरसचा विळखा नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबई पालिका प्रशासनाने भाग सील करण्यास सुरूवात केली. मात्र त्याका विरोध करत काही जणांनी पालिकेच्या कर्मचार्यांवर हल्ला केला. संबंधित आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून एकाला अटक झाली असून अन्य 7-8 जणांचा शोध सुरू आहे.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्हिडिओ च्या माध्यमातून जनतेला घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. आपण कोरोना विरुद्ध हे मोठं युद्ध सुरु केलं आहे. ही लढाई आपल्याला जिंकायची आहे. त्यासाठी घरात राहून तुम्हाला देशसेवा करण्याची जी संधी मिळाली आहे त्याचे सोनं करा असा संदेश त्यांनी दिला आहे.
भारतामध्ये आज चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच राम नवमीचा सण आहे. पण सध्या कोरोना व्हायराचं जागतिक आरोग्य संकट समोर उभं असल्याने हा सण सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्याऐवजी घरगुती स्वरूपात साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी ट्विटरच्या माध्यमातून भारतीयांना तसेच जगभर पसरलेल्या रामभक्तांना ट्विटच्या माध्यमातून राम नवमीच्या शुभेच्छा दिल्या आहे. भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 1800 च्या पार गेला आहे. त्यामुळे दिवसागणिक वाढणारी कोरोनाग्रस्तांची संख्या आता चिंतेची बाब बनत चालली आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधितांमध्ये महाराष्ट्र राज्य वरच्या स्थानी आहे. मुंबई शहरात त्याचं प्रमाण अधिक असल्याने आता प्रशासनाकडून अधिक कडक पावलं उचलली जात आहेत. Ram Navami 2020 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून देशवासियांना दिल्या राम नवमीच्या शुभेच्छा.
भारताप्रमाणेच इटली, स्पेन पाठोपाठ अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरस मोठं संकट बनत चाललं आहे. अमेरिकेमध्येही कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे तर त्याच्या सोबतीने या आजाराने बळी घेणार्यांची संख्या देखील थरकाप उडवणारी आहे. सध्या भारतामध्ये 14 एप्रिल पर्यंत 21 दिवसांचा लॉकडाऊन आहे. याकाळात नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळण्याचं प्रशासनाकडून वारंवार आवाहन केलं जात आहे. सध्या पोलिस, वैद्यकीय यंत्रणा 24 तास नागरिकांना कोरोना व्हायरसपासून सुरक्षित ठेवण्यासाठी काम करत आहेत.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दिल्लीतील निजामुद्दीन पश्चिम येथील मरकजमध्ये तबलिगीच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. आताते पुन्हा मूळ गावी परतल्याने त्यांच्याद्वारा कोरोना संसर्ग झपाट्याने होऊ शकतो अशी भीती आहे. सध्या या धार्मिक कार्यक्रमामध्ये जमलेल्या लोकांनी ज्या रेल्वेतून प्रवास केला, त्या 5 रेल्वेगाडय़ातील त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रवाशांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)