कोरोना व्हायरससाठी मलेरियाचे औषध Chloroquine उपयोगी ठरू शकते- राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प; 19 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, डॉक्टरांचा हवाला देत सांगितले की, मलेरियाचे औषध Chloroquine हे कोरोना व्हायरससाठी उपयोगी ठरू शकते. असा दावा केला जात आहे की ते त्वरित उपलब्ध होईल.
2012 दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणाची सुनावणी सध्या दिल्ली हाय कोर्टात चालू आहे. या दरम्यान, कोर्टाचे म्हणणे आहे की, 'कोणतेही प्रतिज्ञापत्र नाही, मेमो नाही, या प्रकरणात काहीही नाही. असे असताना वकील एपी सिंह यांना ही याचिका दाखल करण्यास परवानगी आहे का?' यावर सिंह यांनी, कोरोना व्हायरसमुळे कोणतेही फोटो कॉपी मशीन काम करत नसल्याचे उत्तर दिले.
नगर जिल्ह्यातील 51 वर्षीय पुरुषाला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आपल्या पत्नीसह तो दुबईला गेला होता, मात्र त्याची पत्नी कोरोना निगेटिव्ह आहे. यासह आज राज्यात तीन नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेत, राज्यात येणाऱ्या पर्यटक बसेसवर बंदी घातली आहे. मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी ही माहिती दिली.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर कामावर अथवा ऑफिसला येऊ न शकलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन कापण्यात येऊ नये. कर्मचाऱ्यालाही आपल्याप्रमाणेच घर, कुटुंब आहे. तोही आपल्याप्रमाणेच कोरना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लढतो आहे. कुटुंबाला वाचवत आहे. म्हणूनच मानवतेच्या दृष्टीकोनातून त्याला सहकार्य करा. त्याचे वेतन कापू नका असे अवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
कोरोना व्हायरसच्या अत्यंत कठीण संकटाचा सामना करण्यासाठी काही लोक अत्यावश्यक सेवा देत आहेत. ही सेवा या काळात देणे अत्यंत महत्वाची बाब आहे. डॉक्टर्स, परिचारिका, केंद्र सरकारी कर्मचारी, राज्य सरकारी कर्मचारी, ऑनलाईन फूड सेवा देणारे डिलीव्हरी बॉय, कुरीअरवाले, ज्ञात अज्ञात नागरिक या सर्वांचे कौतुक करावे तितके थोडेच आहेत. म्हणूनच येत्या रविवारी (22 मार्च) सायंकाळी 5 वाजता पाच मिनिटे घराच्या दरवाजात, खिडकीत आभार मानावेत. जेणेकरुन या सर्वांचा उत्साह वाढेन.
22 मार्च रविवार सकाळी 7 ते सायंकळी 7 पर्यंत जनता कर्फ्यूचे पालन करावे. जनता कर्फ्यू काळात कोणताही नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घरातच राहावे. समाजात जाऊ नये. जे केवळ अत्यावश्यक सेवा देणारे नागरिक आहेत त्यांनीच केवळ घराबाहेर पडावे. हे आपल्या आत्मसन्माची गोष्ट आहे. आत्मसन्मान ही देशभक्तीच आहे. देशातील सर्व राज्य सरकारांनी जनता कर्फ्यूचे पालन करावे, असे अवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
कोरोना व्हायरस नियंत्रणात ठेवण्यासाठी सोशल डीस्टन्स बाळगणे महत्त्वाचे. स्वत: इतरांची काळजी घेणे आवश्यक आहे, असे अवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले आहे.
Coronavirus: जनतेने आजवर मला कधीही निराश केले नाही, कोरोना व्हायरस लढाईतही निराश करणार नाही याचा विश्वास आहे. मी आज आपल्याकडे काही मगतो आहे. मला आपले यापुढचे काही आठवडे हवे आहेत - पंतप्रधान मोदी
या आधी जगात झालेल्या दोन महायुद्धांपेक्षाही मोठे असे कोरोना व्हायरसचे संकट आले आहे. या संकटाचा सामना धिराने करायला हवा. संपूर्ण जगावरच कोरोनाचे संकट आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी करताहेत देशातील जनतेला संबोधित
Coronavirus: पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात करणार देशाला संबोधीत. काय बोलणार याबाबत उत्सुकता. कोरोना व्हायस नियंत्रणात आणण्यासाठी मोठे निर्णय जाहीर केले जाण्याची शक्यता.
राज्यात अन्नधान्याचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. आवश्यकता भासल्यास दोन महिने पुरेल इतके धान्य स्वस्थ धान्य दुकानातून (रेशनिंग दुकान) वितरीत करण्यात येईल, असे राज्याचे अन्न व नागरिकी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रक्तपेढ्यांमधील रक्तसाठा कमी होत चालला आहे. त्यामुळे निरोगी व्यक्तींनी अधिकाधिक रक्तदान करावे असे अवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
महाराष्ट्रासह देशभरात वाढणाऱ्या कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या विचारात घेता विदेशातून भारतात येणाऱ्या सर्व विमानांवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. काही वेळात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला संबोधित करणार आहेत. या वेळीही अनेक निर्णय जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.
Coronavirus: मास्क, सॅनिटायझर यांची साठेबाजी, काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. मास्क आणि सॅनिटायझर यांची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे काही लोक त्याची साठेबाजी करत असल्याच्या घटना पुढे येत आहेत. मात्र, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
कोरोना व्हायरस आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने दिलेल्या सूचना सर्वांसाठी बंधनकारक आहेत. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याती येईल असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
सोलापूर येथे नियमीतपणे शुक्रवारी आयोजित केला जाणारा सामूहिक नमाज रद्द करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
मास्क न लावता शिंकला या कारणावरुन थे एका जोडप्याने एका दुचाकीस्वारास मारहाण केल्याची घटना घडल्याचे समजते. कोल्हापूर येथे हा प्रकार घडला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नागरिक तोंडाला रुमाल अथवा मास्क लाऊन प्रवास करत आहेत.
कोरोना व्हायरस नियंत्रणात आणण्यासाठी नागरिक स्वत:हून सहकार्य करतील आणि काळजी घेतील अशी आपेक्षा आहे. मात्र, जर वारंवार अवाहन करुनही नागरिक ऐकत नसतील तर 'लॉकडाऊन' करण्याचा निर्णय घ्यावाच लागेल. सरकार तो घेईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
देशभरातील कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे, काल सुद्धा मुंबई, पुणे, रत्नागिरी येथे कोरोनाचे 4 नवे रुग्ण आढळल्याने आता राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 45 वर पोहचला आहे. तर देशभरातहा आकडा आता 150 च्या पार आहे. याच पार्श्वभूमीवर म्यूख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारतर्फे काही नियम तयार करण्यात आले आहेत, यापूर्वी केवळ शाळा- कॉलेज आणि मॉल्स- हॉटेल्स बंद ठेवण्याच्या निर्णयाला जोडून आता राज्यातील शासकीय कार्यालये एक दिवसाआड पद्धतीने रोज 50 टक्के कर्मचारी कम करतील.असेही सांगण्यात आले आहे. रेल्वे, एसटी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही 50 टक्के क्षमतेने चालवली जाईल. तसेच शहरातील सर्व दुकाने ही Odd- Even दिवसाच्या नियमानुसार सुरु ठेली जातील असेही सांगण्यात आले आहे.
दुसरीकडे, कोरोनाच्या भीतीने अनेकांनी चाचण्या करून घेण्यासाठी रुग्णालयात गर्दी केली असल्याने हॉस्पिटल वर दबाव येत असल्याचे आढळून आले होते, यावर उपाय म्ह्णून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाची तीव्र लक्षणे आढळून आल्यास किंवा कोरोना व्हायरसची लागण झालेल्या देशातून प्रवास केला असेल, तरच कोरोनाची चाचणी केली जाईल अशी माहिती दिली.
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या
दुसरीकडे, उद्या 20 मार्च रोजी निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषीच्या फाशीचा दिवस आहे, त्यापूर्वी आज सर्वोच्च न्यायालय दोषी पवन कुमार गुप्तता याच्या क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी घेणार आहे, गुन्हा घडतेवेळी आपण अल्पवयीन असल्याचे म्हणत पवन यांनी आपल्याला फाशी ऐवजी जन्मठेप द्यावी अशी याचिका केली आहे, तर काल दोषी मुकेश याच्याकडून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती, गुन्ह्याच्या वेळी आपण घटनास्थळी उपस्थित नसल्याचा दावा मुकेश याने केला होता.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)