इटलीमध्ये एका दिवसात कोरोना व्हायरसच्या 475 नवीन मृत्यूची नोंद; 18 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर निर्देशन असताना सुद्धा अनावश्यक याचिका सादर करण्यात आली आहे. यामुळे याचिकाकर्त्याच्या विरोधात 15 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर उच्च न्यायालयाचे कामकाज फक्त दोन तास सुरु ठेवले जात आहे.

19 Mar, 05:20 (IST)

कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत सर्वात मृत्यू चीनमध्ये झाल्याचे समजत होते, मात्र आता इटलीलाही तितकाच मोठा फटका बसत आहे. इटलीमध्ये एका दिवसात कोरोना व्हायरसच्या 475 नवीन मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत कोणत्याही देशासा ही सर्ठीवात मोठा नंबर आहे. 

19 Mar, 04:31 (IST)

कोरोना विषाणूच्या संशयित रुग्णाने, बुधवारी दिल्ली, सफदरजंग रुग्णालयाच्या इमारतीतून उडी मारून आत्महत्या केली. मात्र रुग्णालयाने या हा व्यक्ती नक्की कोण होता याबाबत अजून पुष्टी केली नाही.

19 Mar, 04:05 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 मार्च 2020 रोजी रात्री 8 वाजता देशाला संबोधित करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी ते कोरोना व्हायरस आणि त्याच्याशी लढण्याच्या प्रयत्नांविषयी चर्चा करतील.

19 Mar, 03:58 (IST)

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई, सर्व शैक्षणिक संस्थांना सध्याच्या चालू परीक्षा 31 मार्चपर्यंत तहकूब करण्याचा आदेश, मानव संसाधन विकास मंत्रालयाने दिला आहे.

 

19 Mar, 03:49 (IST)

आज नागपूर येथील सर्व रेस्टॉरंट्स, बार, दारूची दुकाने आणि पान टपऱ्या 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र सर्व जीवनावश्यक वस्तू म्हणजेच औषध दुकाने, पेट्रोल पंप, फळे-भाजीपाला, किराणा  साहित्य व  दैनंदिन लागणाऱ्या आवश्यक वस्तू या सर्व सेवा व दुकाने सुरू राहणार असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली आहे.

19 Mar, 02:55 (IST)

रत्नागिरीतील एका 50 वर्षीय व्यक्तीची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ही व्यक्ती दुबईहून प्रवास करून आली होती. या प्रकरणासह महाराष्ट्रात एकूण सकारात्मक रुग्णांची संख्या 45 वर पोहोचली आहे.

 

19 Mar, 02:12 (IST)

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी, उद्यापासून मुंबईतील महत्वाच्या 50 टक्के रस्त्यांवरील दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एकदिवसाआड लॉकडाऊन केले जाणार आहे. गर्दीच्या ठिकाणांवरील शॉपिंग सेंटर्स, मार्केट बंद राहणार असल्याची माहितीही आयुक्तांनी दिली. 

19 Mar, 01:14 (IST)

भारतीय महिला पंच जानी नारायणन आणि वृंदा राठी यांचे आतंराष्ट्रीय महिला पंचाच्या यादीत समावेश करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. ट्वीट- 

 

19 Mar, 24:09 (IST)

येस बॅंकींगच्या ग्राहकांनी गेल्या काही दिवसांपासून अनेक अडचणीचा सामना करावा लागला आहे. यातच येस बॅंकेने ट्वीटच्या माध्यातून त्यांच्या ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. आमची बॅंकींग सेवा कार्यरत झाली असून ग्राहकांना सेवेचा अनुभव घेता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. ट्वीट-

 

 

18 Mar, 23:18 (IST)

कोरोना व्हायरसच्या पाश्वभूमीवर प्रसासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. यातच कोरोनाची तपासणी करण्यासाठी राज्यात 8 ठिकाणी लॅब सुरु करण्यात येणार आहेत. तर, यापैंकी 3 तपासणी लॅब उद्यापासूनच सुरु करण्यात येणार आहे. तसेच तपासणीसाठी लागणारे उपकेंद्र मिळवण्यासाठी केंद्रकडे मागणी केली असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.

 

18 Mar, 22:50 (IST)

कोरोना व्हायरसने महाराष्ट्रातही धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 43 जण कोरोना बाधित असल्याची आकडेवारी समोर आली आहे.  कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर नागपूर येथील मद्य दुकाने, रेस्टॉरंट्स आणि पान बीडीचे दुकाने येत्या 31 मार्चपर्यंत बंद ठेण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली आहे. ट्वीट- 

 

18 Mar, 22:11 (IST)

कोरोनामुळे वाराणसीमधील गंगा आरती तर जम्मू-काश्मीरमधील वैष्णव देवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. 

18 Mar, 21:36 (IST)

कोरोनाची लागण झालेल्या 4 संशयितांचा गरिब रथ रेल्वेतून प्रवास करत असल्याचे समोर आले. त्यामुळे रेल्वे पालघर स्थानकात थांबवून या संशयितांना खाली उतरवण्यात आल्यानंतर तेथील जिल्हारुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

18 Mar, 20:28 (IST)

तेलंगणा येथे कोरोनाचा पॉझिटिव्ह सहावा रुग्ण आढळला असून तो युके येथून भारतात परतला होता.

18 Mar, 20:15 (IST)

निर्भया प्रकरणी आरोपी मुकेश याची फाशी पासून बचाव करण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून घटनेच्या वेळी उपस्थित नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

18 Mar, 19:54 (IST)

कोरोना व्हायरसमुळे कर्नाटकातील प्रसिद्ध इस्कॉन मंदिर भाविकांसाठी बंद  करण्यात आले आहे. 

18 Mar, 19:46 (IST)

इंडोनेशिया येथून नोएडा येथे आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून भारतात रुग्णांचा आकडा  149 वर पोहचला  आहे. 

18 Mar, 19:28 (IST)

नवी मुंबई येथील डी.वाय. पाटील स्टेडिअम जवळ भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.  अद्याप या प्रकरणी अधिक माहिती समोर आली नसून सोशल मीडियात त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

18 Mar, 19:06 (IST)

गोवा येथे कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती खोटी असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

18 Mar, 18:50 (IST)

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नागपूर येथील पोलिसांना मास्क वापरण्याची सूचना देण्यात आली आहे. 

Read more


कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर निर्देशन असताना सुद्धा अनावश्यक याचिका सादर करण्यात आली आहे. यामुळे याचिकाकर्त्याच्या विरोधात 15 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर उच्च न्यायालयाचे कामकाज फक्त दोन तास सुरु ठेवले जात आहे. कोरोनाची राज्यातील परिस्थिती पाहता महत्वाच्या निर्णयांवरच सुनावणी केली जात आहे. दंडाची रक्कम ही सेंट ज्यूड्स इंडिया चाईल्डकेर सेंटरला देण्याचे निर्देशन हायकोर्टाने दिले आहेत. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या 41 वर पोहचली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

रत्नागिरी येथे 24 मार्चला पार पडणारी भैरवगड यात्रा रद्द करण्यात आली आहे. कोरोनाच्या धास्तीने मंडळाने हा निर्णय घेतला आहे. तसेच जिल्हा रुग्णालयात कोरोना व्हायरसचे 7 संशयित रुग्ण दाखल झाले आहे.(कोरोना व्हायरस संकट काळात BMC ने जारी केले महत्वाचे नियम; रस्त्यावर थुंकल्यास होणार 1000 रुपये दंड, जाणून घ्या सविस्तर)

दुसऱ्या बाजूला कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून लांब पल्याच्या गाड्या रद्द करण्यात येत आहे. नागरिकांना अनावश्यकक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आहे. त्याचसोबत परदेशातून येणाऱ्या नागरिकांना सध्या भारतात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now