Coronavirus Update in India: भारतात महाराष्ट्र पाठोपाठ या '2' राज्यांमधील कोरोना बाधितांची संख्या 10,000 च्या पार, पाहा राज्यनिहाय ताजे अपडेट्स

त्यापाठोपाठ गुजरात मध्ये सर्वाधिक म्हणजेच 10,988 रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ तमिळनाडू, नवी दिल्लीत सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत.

Coronavirus | Photo Credits: Pixabay.com

भारतात कोरोनाची (Coronavirus) स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून काल दिवसभरात एकूण 4987 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 90, 927 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 120 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. सद्य स्थितीत देशात 53,946 रुग्ण उपचार घेत असून 34,109 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर आतापर्यंत एकूण 2872 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. ही संख्या पाहता सध्या भारतासाठी खूप अवघड परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असून या राज्यांत एकूण 30, 706 रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ गुजरात मध्ये सर्वाधिक म्हणजेच 10,988 रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ तमिळनाडू, नवी दिल्लीत सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. Atma Nirbhar Bharat Economic Package संदर्भात आज सकाळी 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची अखेरची पत्रकार परिषद

पाहा कोविड-19 रुग्णांची राज्यनिहाय आकडेवारी

S. No. Name of State / UT Total Confirmed cases* Cured/Discharged/Migrated Deaths**
1 Andaman and Nicobar Islands 33 33 0
2 Andhra Pradesh 2355 1353 49
3 Arunachal Pradesh 1 1 0
4 Assam 92 41 2
5 Bihar 1179 453 7
6 Chandigarh 191 51 3
7 Chhattisgarh 67 56 0
8 Dadar Nagar Haveli 1 0 0
9 Delhi 9333 3926 129
10 Goa 17 7 0
11 Gujarat 10988 4308 625
12 Haryana 887 514 13
13 Himachal Pradesh 78 43 3
14 Jammu and Kashmir 1121 542 12
15 Jharkhand 217 113 3
16 Karnataka 1092 496 36
17 Kerala 587 495 4
18 Ladakh 43 22 0
19 Madhya Pradesh 4789 2315 243
20 Maharashtra 30706 7088 1135
21 Manipur 7 2 0
22 Meghalaya 13 11 1
23 Mizoram 1 1 0
24 Odisha 737 196 3
25 Puducherry 13 9 1
26 Punjab 1946 1257 32
27 Rajasthan 4960 2839 126
28 Tamil Nadu 10585 3538 74
29 Telengana 1509 971 34
30 Tripura 167 64 0
31 Uttarakhand 88 51 1
32 Uttar Pradesh 4258 2441 104
33 West Bengal 2576 872 232
Cases being reassigned to states 290
Total number of confirmed cases in India 90927# 34109 2872
*(Including foreign Nationals)
**( more than 70% cases due to comorbidities )
#States wise distribution is subject to further verification and reconciliation
#Our figures are being reconciled with ICMR

अमेरिकेत गेल्या 24 तासात 1237 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. याबाबत AFP न्यूज यांनी अधिक माहिती दिली आहे. जगातील अन्य देशांतील कोरोनाच्या परिस्थिती बाबत बोलायचे झाल्यास रुस येथे सुद्धा कोविड19 ने थैमान घातले आहे. शुक्रवारी रुसमध्ये 9200 नवी प्रकरणे समोर आली होती. रुस येथे 2,72,042 जणांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. तसेच 2537 जणांचा बळी गेला आहे. त्याचसोबत इटली येथे 31,763 जणांचा मृत्यू झाला असून 2,24,760 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.