आर्मी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्य दलाच्या जवानाला (लडाख स्काऊट्स) कोरोना व्हायरसची पुष्टी झाली आहे. सैन्य दलातील हे पहिलेच प्रकरण आहे. या जवानाचे वडील इराणहून परत आले होते. सध्या जवानावर उपचार सुरू असून, त्याच्या बहिण, पत्नीसह संपूर्ण कुटुंबाला वेगळे ठेवण्यात आले आहे. जवानाच्या वडिलांचीही चाचणी सकारात्मक आली आहे.
इटलीमध्ये कोरोना विषाणूने कहर माजवला आहे. सध्या मिळालेल्या अहवालानुसार देशात कोरोना व्हायरसच्या 3,526 नवीन प्रकरणांची पुष्टी झाली असून, 345 नवीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पश्चिम बंगालमध्ये कोरोना व्हायरसच्या पहिल्या सकारात्मक घटनेची पुष्टी झाले आहे. 18 वर्षीय व्यक्तीला कोरोना व्हायरस झाला असून, ही व्यक्ती इंग्लंड येथून परतली आहे. सध्या या व्यक्तीला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
ब्रिटनच्या मॅनचेस्टर शहरामध्ये 22 जणांचा बळी घेणारा आत्मघाती हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा भाऊ, हाशेम आबेदी याला 2017 च्या हल्ल्यात 22 जणांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीः रस्ते, रेल्वे, हवाई, जलमार्ग किंवा इंटरनेट यांसारख्या, अनेक क्षेत्रातील आमचे योगदान हे दोन देशांच्या (भारत आणि बांगलादेश) लोकांना जोडत आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने प्रशिक्षण कार्यक्रम पुढे ढकलला. भारतीय लष्कराकडून 90 प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, देशभरात उद्भवलेली स्थिती विचारात घेता लष्कराने आपला कार्यक्रम पुढे ढकलला आहे.
कोरोनाव्हायरसचा धोका लक्षात घेता मुंबई पोलिसांनी ऑर्केस्ट्रा / डान्स बार, डिस्कोथेक, पब, लाइव्ह बँड आणि डीजे 31 मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथील लाल किल्ला, आग्रा येथील ताजमहाल आणि गुजरात राज्यातील स्टॅच्यु ऑफ युनिटी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आहे. ही पर्यटन स्थळं येत्या 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत
लातूर जिल्ह्यातील एका गावात चक्क दवंडी देत कोरोना व्हायरसबाबत जनजागृती केली जात आहे. त्याबाबतचा एक व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. दरम्यान, लातूर जिल्ह्यातील नेमका कोणत्या गावातील हा व्हिडिओ आहे त्याबाबत माहिती मिळू शकली नाही.
राज्यात आज घडीला कोराना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या 40 इतकी आहे. त्यात 26 पुरुष, 14 महिलांचा समावेश आहे. सर्वांचीच प्रकृती वाईट नाही. केवळ एका रुग्णाची प्रकृती गंभीर आहे. मुंबई लोकल बंद करण्याचा, अथवा सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली नाही, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
आज सकाळपासून एक बातमी सांगितली जात आहे की, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. पण, असा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी नाही. मात्र, कमीत कमी कर्मचाऱ्यांमध्ये काम कसे करता येईल यावर निश्चित विचार केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सध्यास्थितीत तरी मुंबई लोकल बंद केल्या जाणार नाहीत, अशी माहिती मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. कोरोना व्हायरस आटोक्यात आणण्यात येणार अशी जोरदार चर्चा आज सकाळपासून होती. मात्र, राज्य विधिमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकी असा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.
राज्यातील COVID-19 रुग्णांची संख्या वाढून ती 40 वर पोहोचली आहे. या आधी ही संख्या 38 इतकी होती. मात्र, मुंबई आणि पुणे (पिंपरी चिंचवड) येथे कोरोना व्हायरस बाधित प्रत्येकी एक अशा दोन व्यक्तींची चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यामुळे हा आकडा 40 वर पोहोचला आहे.
Coronavirus: पुणे शहरातील आरटीओ कार्यालय, आधार केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे. सरकारी कार्यालयं 7 दिवस बंद राहणार आहेत. केवळ पाणीपुरवठा, आरोग्य, वीज अशी कार्यालयं सुरु राहतील. परिस्थिती सर्वसामान्य होईपर्यंत आरटीओ कार्यालयंही बंद राहणार आहेत. त्यामुळे कोणीही आरटीओ कार्यालयात गर्दी करु नये. या काळात कोणत्याही वाहन चालवण्याच्या परवान्यांची नुतनीकरण होणार नाही. नवे परवाणे वितरीत केले जाणार नाहीत. बीएस 4 आणि इतर वाहनांची नोंदनी विविध शोरुम्स मध्ये केली जाऊ शकते. वाहन चालवण्याचा परवाना ऑनलाईन नोंदणी करण्यात येईल. येत्या 31 मार्च पर्यंत सर्व आधार केंद्र बंद राहतील. आधार कार्ड काढण्यासठी बायोमेट्रीक केले जाते. त्यामुळे परिस्तिती सामान्य होईपर्यंत एकही आधार काढले जाणार नाही, असेही विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.
पुणे शहरातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या 17 वर पोहोचली आहे. तर 24 रुग्णांना उपचार करुन सुट्टी देण्यात आली आहे. नव्याने सापडलेला रुग्ण हा पिंपरी चिंचवड शहरातील आहे. तो 14 मार्च या दिवशी अमेरिकेहून आला आहे. पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी ही माहिती दिली
मुंबई - पुणे, नागपूर दरम्यान 23 लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द झाल्या आहेत. यामध्ये डेक्कन एक्स्प्रेस सह महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश आहे. कोरोना व्हायरस दहशतीच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) घातलेले थैमान भारतात सुद्धा तीव्र स्वरूप धारण करत आहे. आतापर्यंत, देशात 100 हुन अधिकांना या व्हूयर्सची लागण झाली आहे तर याचा सर्वात मोठा फटका हा महाराष्ट्राला बसला असून आतापर्यंत 39 च्या वर कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे, परिणामी महाराष्ट्रात चित्रपटगृह, नाट्यगृह यांच्यासह शाळा, कॉलेज 31 मार्च पर्यंत बंद ठेवली जाणार आहेत. तर काल मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर संस्थानाने सुद्धा पुढील सूचना मिळेपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद ठेवणार असल्याचे सांगितले.
पुणे शहरात आजपासून पुढील तीन दिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व दुकाने बंद राहणार आहेत, यामध्ये रोजच्या वापराच्या वस्तू विकणारी आणि मेडिकल्स मात्र समाविष्ट नसतील. दुसरीकडे, काल पुणे आणि नवी मुंबई येथील काही कोरोना संशयित रुग्णांनी पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने आता यापुढे विलगीकरण सेंटर मध्ये असणाऱ्या संशयित रुग्णानाच्या हातावर शिक्का मारला जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या
मध्य प्रदेश सरकारला सादर करायची बहुमत चाचणी सुद्धा या कोरोनामुळे काल लांबणीवर टाकण्याची घोषणा झाली होती मात्र या निर्णयाचं विरुद्ध मध्य प्रदेश भाजप नेते व माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत त्वरित बहुमत चाचणी व्हावी अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)