ठाण्यातील साकेत झोपडपट्टी भागात आज रात्री आग लागली, कोणतीही जीवितहानी नाही; 17 जून 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, ताज्या घडामोडी, कोरोना अपडेट्स जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी सह जोडलेले रहा...

18 Jun, 04:51 (IST)

ठाण्यातील साकेत झोपडपट्टी भागात आज रात्री आग लागली. पोलिस अधिकारी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (एमएसईडीसी) चे अधिकारी, अग्निशमन दल घटनास्थळी पाण्याचे टँकर घेऊन दाखल झाले आहेत. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखम झाले नाही.

18 Jun, 04:09 (IST)

दिल्लीतही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. दिल्ली येथे आज 2 हजार 214 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर, 67 जणांचा मृत्यू झाला आहे. एएनआयचे ट्विट- 

 

18 Jun, 03:55 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जून 2020 रोजी, व्यापारी उत्खननासाठी 41 कोळसा खाणींच्या लिलावाच्या उद्घाटनाला संबोधित करतील. या लिलावाच्या प्रक्रियेद्वारे भारतीय कोळसा क्षेत्राच्या व्यापारी उत्खननासाठी सुरूवात होणार आहे.

 

18 Jun, 03:34 (IST)

मुंबईमध्ये आज 1,359 नवीन कोरोना व्हायरस रुग्णांची व 77 मृत्यूंची नोंद झाली आहे. अशाप्रकारे शहरातील एकूण संक्रमितांची संख्या 61,501 वर पोहोचली आहे. शहरात आतापर्यंत 3,242 मृत्यूंची नोंद झाली आहे.

18 Jun, 03:10 (IST)

माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे ज्येष्ठ नेते रघुवंश प्रसाद सिंह यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. निकटवर्तीयांनी याबाबत माहिती दिली.

18 Jun, 02:50 (IST)

आज डब्ल्यूएचओचे संचालक Tedros Adhanom Ghebreyesus यांनी दिलेल्या माहितीनुसार, Dexamethasone हे सामान्य स्टिरॉइड, कोरोना व्हायरसच्या गंभीर रूग्णांवरील उपचारामध्ये फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे. यामुळे व्हेंटिलेटरची आवश्यकता असलेल्या रूग्णांच्या मृत्यूदरामध्ये जवळजवळ एक तृतीयांश घट झाली आहे.

18 Jun, 02:20 (IST)

महाराष्ट्रात आज 3307 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 114 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1,16,752 इतकी झाली आहे. तर आतापर्यंच 5651 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने माहिती दिली आहे.

 

18 Jun, 01:59 (IST)

धारावीत कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे धारावीत कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या 78 झाली आहे. दरम्यान, आज धारावीत 17 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

 

18 Jun, 01:47 (IST)

गेल्या 24 तासांत गुजरातमध्ये 520 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.  तर 27 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

18 Jun, 24:35 (IST)

धारावीत आज 17 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे धारावीतील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2106 वर पोहोचला आहे. तसेच आतापर्यंत धारावीत 77 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

18 Jun, 24:01 (IST)

तामिळनाडूत कोरोना रुग्णांनी  50 हजारांचा टप्पा पार केला आहे. आज राज्यात दिवसभरात 2,174 रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

 

17 Jun, 23:48 (IST)

केरळ मध्ये आज 75 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून 90 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

17 Jun, 23:42 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोना साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्याची योजना आखली.


 

17 Jun, 23:24 (IST)

आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील वेदाद्री गावात ट्रॅक्टरला लॉरीने धडक दिल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे. या ट्रक्टरमध्ये एकूण 26 जण होते. हे सर्व जण या अपघातात जखमी झाले आहेत.

 

17 Jun, 23:05 (IST)

जालना जिल्ह्यात आज 18 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. यात पोलीस दलातील 2 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 308 वर पोहचली आहे.

17 Jun, 22:12 (IST)

लडाख मधील तणावानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची फोनवरुन चर्चा.

17 Jun, 21:44 (IST)

Galwan Valley मध्ये झालेल्या झटापटीत शहीद झालेल्या स्थानिक जवानांच्या कुटुंबियांना 5 लाखासह सरकारी नोकरी देण्याचे पश्चिम बंगाल मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी आश्वासन दिले आहे.

17 Jun, 21:32 (IST)

वाढत्या रुग्णांसह आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर देणार. प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार मिळतील याकडे लक्ष पुरवणार. त्याचबरोबर अधिक चाचण्या करण्याकडे कल असेल. विशेष म्हणजे कोविड-19 च्या काळात Test,Trace आणि Isolate ही त्रिसुत्री वापरणार असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

17 Jun, 21:29 (IST)

3 महिन्यांपूर्वी जगासह भारतात PPE कीट आणि डायनोगस्टिक कीटचा तुटवडा होता. आपल्याकडे खूप मर्यादीत स्वरुपात या गोष्टी उपलब्ध होत्या कारण आपण याची आयात करत होतो. पण आता आपल्याकडे 1 कोटींहून अधिक PPE कीट्स अपलब्ध आहेत. तितकेच N95 मास्कही आहेत. असेही मोदींनी सांगितले.

17 Jun, 21:23 (IST)

व्हेंटिलेटर्स आणि ICU ची गरज फार कमी रुग्णांना भासत असून वेळीच घेतलेल्या खबरदारीमुळे कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणणे शक्य झाले असल्याचेही मोदी म्हणाले.

Read more


कोरोना व्हायरसच्या कठीण काळात आता भारतापुढे अजून एक संकट उभे ठाकले आहे. भारत-चीन सीमावाद काही दिवसांपासून पुन्हा डोके वर काढू लागला होता. मात्र त्यात दोन्ही सैन्यांनी शांततापूर्व माघार घेतली होती. परंतु, काल लडाख मधील गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांसोबत झालेल्या झटापटीत भारताचे जवळपास 20 जवान शहीद झाले आहेत. तर चीनी सैन्यातील 43 सैनिक जखमी झाले आहेत.

भारतातील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसागणित मोठी भर पडत आहे. त्यामुळे भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 343091 वर पोहचला आहे. देशातील 153178 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 180013 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील एकूण 9900 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

देशातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत. बुधवार, 17 जून दिवशी पंतप्रधान दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, गुजरात, बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांसोबत चर्चा करण्यात येईल. दरम्यान कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर घेतली जाणारी ही सहावी बैठक असेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement