मुंबई: कलिना परिसरात एका महिलेवर थुंकून पळ काढणाऱ्या दुचाकीस्वराला पकडण्यात पोलिसांना यश; 17 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
महाराष्ट्रात आज नवे 118 कोरोनाचे रुग्ण तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 3320 वर पोहचल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाच्या नॉन-हॉटस्पॉट ठिकाणी येत्या 20 एप्रिल पासून आरोग्य, शेती आणि बागकाम, नारळ, काजू आणि मसाल्याची शेती, पशुसंवर्धन, बँकेच्या शाखा, एटीएम, ई-कॉमर्स कंपन्या सुरु होणार आहेत.
तेलंगणा येथे आज कोरोनाचे नवे 66 रुग्ण आढळून आल्याने आकडा 562 वर पोहचला आहे. तसेच 18 जणांचा कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर 186 जणांची प्रकृती सुधारुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
केरळात आज फक्त 1 जण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. तर 10 जणांची प्रकृती सुधारली आहे. आतापर्यंत केरळात 138 कोरोनाबाधित रुग्ण तर 255 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
कोरोना संकटकाळात गोरगरीब जनतेला रेशनदुकानांतून होत असलेल्या धान्यवाटपात गैरप्रकार होऊ नये,धान्यवाटप सुरळीत व विनातक्रार व्हावे यासाठी सर्वं पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात व्यक्तीश: लक्ष घालून जबाबदारी घ्यावी असे अवाहन राज्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
गेल्या 24 तासात 1007 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 23 जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली.
भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना शासनाचा दिलासा : घरभाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी, घरभाडे भरले नाही म्हणून किंवा घरभाडे थकल्याने कुणालाही घराबाहेर काढू नये- गृहनिर्माण विभागाच्या राज्यातील घरमालकांना सूचना
चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. देशातीतल कोरोना बाधितांची संख्या 12 हजाराच्या वर गेली आहे. तर महाराष्ट्रात 3 हजार पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात वेगाने होणाऱ्या कोरोना विषाणूच्या संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून एका दिवसात वाढणाऱ्या रुग्णांचा आकड्यात घट होणे ही दिलासादायक बाब आहे, असल्याचा दावा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केला आहे.
देशातील एकूण कोरोना चाचणीचा विचार केल्यास महाराष्ट्रात २० टक्के चाचण्या घेण्यात आल्या आहेत. राज्यात सर्वाधिक 80 टक्के चाचण्या एकट्या मुंबईमध्ये करण्यात आल्या आहेत. राज्यात मुंबई शहर आणि उपनगरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान, राज्यात अजून संसर्गाचे समूह संक्रमण नसल्याचा दावा राज्य शासनाकडून केला जात आहे. परंतु, रुग्णाचा कोणताही प्रवास नसतानाही संसर्ग वाढत आहे. महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, तेलगंणा आदी राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या 1640 वर पोहोचली आहे.