जलालाबादमधील कासारी गावात जमीन वादावरून दोन गटात झालेल्या चकमकीत अनुसूचित जातीतील एका व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आणि 4 जण जखमी झाले. दोन जणांना अटक करण्यात आली असून एका फरार आरोपीला लवकरच अटक केली जाईल, असे शाहजहांपूरचे पोलिस अधीक्षक एस आनंद यांनी सांगितले.
जलालाबादमधील कासारी गावात जमीन वादावरून दोन गटात झालेल्या चकमकी प्रकरणी दोघांना अटक; एक आरोपी फरार ; 16 डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
भारतीय सेनेने 16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय मिळविल्याने हा दिवस संपूर्ण देशभरात 'विजय दिवस' (Vijay Diwas) म्हणून साजरा केला जातो. भारताच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहून ठेवावा असा हा दिवस आहे. या युद्धात ज्या जवानांनी आपल्या प्राणांची आहुती त्या शहीदांना देखील श्रद्धांजली दिली जाते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून सर्वांना विजय दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय सेनेने 1971 मध्ये आजच्याच दिवशी ऐतिहासिक विजय मिळवला. त्यांच्या साहसाची आणि पराक्रमाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. अशा या महान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा असे अमित शाह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
तर दुसरीकडे आज संपूर्ण देशाला हादरवून टाकणारे निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण याच दिवशी घडले होते. या घटनेला आज 8 वर्षे झाली. आमच्या मुलीला न्याय मिळाला पण तो न्याय मिळवण्यासाठी आम्हाला 8 वर्षे वाट पाहावी लागली अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने दिली आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान महाराष्ट्रात 3442 नव्या रुग्णांसह राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 18 लाख 86 हजार 807 वर पोहोचली आहे. तर मृतांची एकूण संख्या 48,339 वर पोहोचली आहे.