Coronavirus: Coronavirus: नव्या64 रुग्णांसह नवी मुंबई शहरात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 974; 14 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

15 May, 05:12 (IST)

मुंबई शहरारप्रमाणेच नवी मुबईमध्येही कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या हळूहळू वाढते आहे. आज नव्या 64 रुग्णांसह नवी मुंबई शहरात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 974 वर पोहोचली आहे.

15 May, 04:31 (IST)

रत्नागिरी पोलिसांनी ट्विट करुन म्हटले आहे की,  DySp. प्रवीण पाटील साहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दाभोळ पोलिस स्टेशनचे API सुनील पवार, PSI कदम व पोलिस मित्राच्या पथकाने पळालेला करोना पॉझिटिव्ह रुग्णाला दम वगैरे न देता प्रेमाने समजावले व दाभोळ कोळथरे येथुन पुढील उपचारासाठी रूग्णालयात पाठवले.

15 May, 04:04 (IST)

सिक्कीम सरकारची काही निर्बंधांसह रेस्टॉरंट्स, फास्ट फूड शॉप्स उघडण्यास परवानगी; आंतर-जिल्हा टॅक्सी, खासगी वाहने हे सम-विषम नियमाद्वारे धावतील.

15 May, 03:44 (IST)

गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन दरम्यान सार्वजनिक/खाजगी वाहतुकीवरील निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर, रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या प्रवाश्यांना फेरीसाठी राज्य/केंद्रशासित प्रदेशांकडून विशेष बसेस भाड्याने देण्याची परवानगी देण्यात आली आहे.

15 May, 02:56 (IST)

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याबद्दल “खोट्या”, “मानहानीकारक” बातम्या प्रसिद्ध केल्याप्रकरणी बातमी वेबसाइटवर खटला दाखल करण्यात आल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

15 May, 02:37 (IST)

मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण पसरले आहे. मुंबईत आज आणखी 998 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. तर, 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येने 16 हजार 579 चा आकडा गाठला आहे. यापैकी 621 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 4 हजार 234 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. एएनआयचे ट्वीट- 

 

 

 

15 May, 02:10 (IST)

महाराष्ट्रात आज कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ दिसून आली आहे. राज्यात दिवसभरात 1 हजार 602 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 44 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 27 हजार 524 वर पोहचली आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

 

15 May, 01:23 (IST)

कोरोना विषाणूमुळे मुंबईतील आणखी 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.  शिवडी पोलीस ठाण्यातील एएसआय मुर्लीधर वाघमारे आणि शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील पीएन भगवान पार्ते यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

 

15 May, 24:44 (IST)

महाराष्ट्रातील पुणे शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

15 May, 24:01 (IST)

मुंबई येथील धारावीत परिसरात कोरोना विषाणूचे जाळे मोठ्या वेगाने पसरत चालले आहे. धारावीत आज 33 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या 1 हजार 61 वर पोहोचली आहे. तर, कोरोनाबळींची संख्या 42 वर पोहचली आहे. एएनआयचे ट्वीट-

 

14 May, 23:30 (IST)

कोरोना विषाणूचे जाळे संपूर्ण देशात पसरत चालले आहे. यातच केरळात आणखी 26 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 560 वर पोहचली आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

14 May, 22:38 (IST)

आदिवासींना रोजगाराच्या संधी मिळाव्यात म्हणून 6 हजार कोटींच्या राज्य सरकारच्या प्रस्तावांना लवकरच मंजुरी देणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे. 

14 May, 22:29 (IST)

50 लाख फेरीवाल्यांसाठी 5  हजार कोटींच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

14 May, 22:24 (IST)

मुद्रामधून 50 हजारापर्यंत कर्ज घेणाऱ्यांना 2 टक्क्यांची मदत केली जाणार आहे.

14 May, 22:22 (IST)

कमी भाड्यात मजूर, शहरी गरिबांना घरे मिळणार असल्याचे निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे. 

14 May, 22:20 (IST)

प्रवासी मजूरांसाठी भाडे तत्वावर घराची योजना येणाऱ्या काळात लॉन्च करण्यात येणार असून त्यांचा लाभ घेता येईल असे निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे. 

14 May, 22:17 (IST)

One Nation One Ration Card योजना लवकरच येणार असल्याचे  निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केले आहे.  त्यामुळे रेशन कार्डचा वापर देशभरात कुठेही करता येणार आहे. 

14 May, 22:13 (IST)

प्रवासी मजूरांना  2 महिन्याचे विनामुल्य अन्नधान्य दिले जाणार असल्याचे  निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे. कार्ड नसणाऱ्यांना 5 किलो रेशन आणि 1 किलो डाळ मिळणार असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे. 

14 May, 22:11 (IST)

प्रवासी मजूरांना मनरेगाच्या अंतर्गत काम दिले जाणार असल्याचे निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे. 

14 May, 22:07 (IST)

मजूरांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी होणार आहे. तसेच मजूरांच्या मजूरीतील तफावत दूर करण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात येणार आहे. मजुरांना किमान 200 रुपये मजूरी मिळणार असल्याचे निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केले आहे. 

Read more


देशभरात सध्या कोरोनाचे महासंकट ओढावल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिकांना वारंवार कोरोनासंबंधित माहिती देत काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. तर नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनची घोषणा केली आहे. मात्र चौथ्या टप्प्यातील लॉकडाउन दरम्यान कोणत्या गोष्टींना सुट दिली जाणार आणि कोणत्या नाही ते 18 मे पूर्वी नागरिकांसमोर जाहीर करण्यात येणार आहे. लॉकडाउनच्या काळात विविध राज्यात अडकलेल्या मजूर आणि कामगार वर्गांना आपल्या घरी पाठवण्यात येत आहे. त्यांच्यासाठी श्रमिक स्पेशल ट्रेन सुद्धा सुरु करण्यात आल्या आहेत.

दुसऱ्या बाजूला आता महाराष्ट्रातील काही ठिकाणी अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. बारामती येथे वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच काही ठिकाणी गारपीठ पडल्याचे ही दिसून आले. मे महिन्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात पाऊस पडल्याने नागरिकांना दिलासा जरी मिळाला असला तरीही बळीराजाच्या पिकांचे नुकसान झाल्याने हवालदिल झाला आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

दरम्यान, भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 74281 वर पोहचला आहे. तर उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या 47480 असून 2415 जणांचा आता पर्यंत कोरोनामुळे बळी गेला आहे. नागरिकांनी सद्यची कोरोनाची परिस्थिती पाहता ती गांभीर्याने घ्यावी असे वारंवार सांगण्यात येत आहे. त्याचसोबत सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now