झारखंडमध्ये कोरोनाबाधित संख्येत आणखी वाढ; 14 जून 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

15 Jun, 05:19 (IST)

झारखंडमध्ये कोरोनाबाधित संख्येत आणखी वाढ झाली असून आज 37 नवे रुग्ण सापडले आहेत. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 हजार 761 वर पोहचली आहे. यापैकी 905 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, 9 जणांचा मृत्यू झाला आहे. एएनआयचे ट्विट- 

 

15 Jun, 04:26 (IST)

तेलंगणा राज्यातून एक धक्कादायक बातमी आहे. तेंलगणात 23 पत्रकारांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. तेलंगणात आतापर्यंत 60 पत्रकारांना कोरोना व्हायरस संक्रमन झाले आहे. त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. तेलंगणा राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली.

15 Jun, 04:19 (IST)

सुशांतसिंग राजपूत याने मुंबईच्या वांद्रे येथील निवासस्थानी आत्महत्या केली. त्याला
श्रद्धांजली म्हणून ओडिशातील Manas Kumar Sahoo नावाच्या शिल्पकाराने वाळूशिल्प साकारुन सुशांत सिंह राजपूत याला श्रद्धांजली अर्पण केली.

15 Jun, 03:42 (IST)

ओडीसा येथील एका व्यक्तीने वाळूच्या साहाय्याने छायाचित्र तयार करून त्यांना श्रद्धांजली वाहली आहे. एएनआयचे ट्विट-  

 

15 Jun, 03:04 (IST)

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबईत सापडले आहेत. ज्यामुळे नागरिकांच्या मनात घबराट पसरली आहे. मुंबईत आज 1 हजार 395 रुग्णांची भर पडली आहे. तर, 97 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 58 हजार 958 वर पोहचली आहे. एएनआयचे ट्विट- 

 

15 Jun, 02:28 (IST)

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोरोनाच्या नव्या 3390 रुग्णांची भर तर 120 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील COVID19 चा आकडा 107958 वर पोहचला आहे.

15 Jun, 02:26 (IST)

गोव्यात आज कोरोनाचे नव्याने 41 रुग्णांची भर पडल्याने आकडा 564 वर पोहचला आहे.

15 Jun, 02:23 (IST)

गुजरात मधील राजकोट येथे 5.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भुकंपाचे धक्के  जाणवले आहेत. यापूर्वी 5.8 तीव्रतेचे हे धक्के असल्याचे सांगण्यात आले होते.

15 Jun, 02:16 (IST)

जम्मू-कश्मीर मधील कतरा येथे 3.0 तीव्रतेच्या भुकंपाचे धक्के जाणवले आहेत.

15 Jun, 02:05 (IST)

गुजरात येथे गेल्या 24 तासात आणखी 511 कोरोनाबाधित रुग्णांची भर तर 29 जणांचा बळी गेला आहे.

15 Jun, 01:57 (IST)

गुजरात मधील  राजकोटच्या उत्तर-वायव्य-पश्चिम येथे 8.13 मिनिटांनी जाणवले 5.8  तीव्रतेच्या भुकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती NCS यांच्याकडून देण्यात आली आहे.

15 Jun, 01:46 (IST)

ताडोबा येथे वाघाच्या दोन लहान बछड्यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

15 Jun, 01:18 (IST)

पश्चिम बंगाल येथे आणखी 389 कोरोनाबाधित रुग्ण तर 12 जणांचा बळी गेला आहे.

15 Jun, 01:06 (IST)

गौतम बुद्ध नगर येथे आणखी 70 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आकडा 935 वर पोहचला आहे.

15 Jun, 24:40 (IST)

तमिळनाडू येथे 38 जणांचा Coronavirus मुळे आकडा 435 वर पोहचला तर 1974 जणांना कोविड19 चे संक्रमण झाले आहे.

15 Jun, 24:14 (IST)

कर्नाटक येथे आज आणखी 176 रुग्णांची भर पडली असून 5 जणांचा बळी गेला आहे.

15 Jun, 24:01 (IST)

सुशांत सिंग राजपूत याचा गळफास लावल्यामुळे मृ्त्यू पण  शवविच्छेदन रिपोर्ट आल्यानंतर सर्व काही स्पष्ट होईल असे मुंबई पोलीस यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

14 Jun, 23:48 (IST)

ठाण्यातील नागरी स्मशानभूमीतील दोन कर्मचाऱ्यांची COVID19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

14 Jun, 23:24 (IST)

मुंबईतील धारावीत कोरोनाचे नवे 13 रुग्ण आढळून आल्याने आकडा 2043 वर पोहचला आहे.

14 Jun, 22:59 (IST)

साऊथ वेस्ट मान्सून मध्य- नॉर्थ अरेबियन समुद्र, गुजरात, दादरा-नगर हवेली, महाराष्ट्रासह मुंबई, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड आणि बिहारच्या काही भागात दाखल झाल्याचे IMD कडून सांगण्यात आले आहे. 

Read more


ठाण्याच्या घोडबंदर (Ghodbandar) मार्गावरील कापूरबावडी (Kapurbawdi) परिसरात शनिवारी रात्री एका कारची झाडाला धडक लागून भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यावेळी अपघात झाला तेव्हा ही भरधाव कार रस्त्यावर जोरात आदळली. त्या कारमध्ये दारूच्या बाटल्यांवरील कागद सापडले ठाणे पोलिस अधिक तपास करत आहे. जखमी झालेल्यांपैकी एक महिला आहे. या चौघांची नावे अद्याप समजू शकली नाही अपघातामागचे नेमकं कारण काय हे निश्चित झालेले नाही.

अनलॉक 1 (Unlock 1) सुरु झाला असला तरीही देशात कोरोनाचा धोका मात्र टळला नाही आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Health Ministry Of India) माहितीनुसार एका दिवसात कोरोनाचे 11,458 नवे रुग्ण आढळून आले आहेत, यानुसार देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 3 लाख 8 हजार 993 वर पोहचली आहे. यापैकी 1 लाख 45 हजार 779 ऍक्टिव्ह प्रकरणे असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याशिवाय, 1 लाख 54 हजार 330 जणांनी कोरोनावर मात केली आहे तसेच 8884 जणांचा मृत्यू झाला आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

तर महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाग्रस्तांचा आकडा 1,04,568 वर पोहोचला आहे. तसेच आतापर्यंत राज्यात 3830 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने (State Health Department) माहिती दिली आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद जिल्ह्यात आढळून येत आहेत. याशिवाय ग्रामीण भागातदेखील कोरोनाचा संसर्ग वाढ आहे. कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now