कोरोनाच्या काळात स्मार्टफोनवर वेळ घालवण्याचे प्रमाण भारतात 25 टक्क्यांनी वाढले ; 14 डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

कोरोना व्हायरस संसर्गाचे संकट अद्यापही कायम आहे. त्यामुळे अद्यापही धोका टळला नाही. नागरिकांनी काळजी घ्यावी असे अवाहन केंद्र आणि राज्य सरकारने केले आहे. जगभरातील विविध क्षेत्रातील बातम्या, घडामोडी यांबाबतचे ताजे तपशील जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.

15 Dec, 04:57 (IST)

कोरोनाच्या काळात स्मार्टफोनवर वेळ घालवण्याचे प्रमाण भारतात 25 टक्क्यांनी वाढल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.

15 Dec, 04:44 (IST)

मध्य प्रदेशात 10 वी आणि 12वी चे वर्ग येत्या 18 डिसेंबर पासून सुरु होणार  आहेत.

15 Dec, 04:14 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी गुजरात दौऱ्यावर जाणार  आहेत.

15 Dec, 03:24 (IST)

मुंबईत आज पाचशेहून कमी कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. ही मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब आहे. ट्विट-

 

 

15 Dec, 03:14 (IST)

नागालॅंड येथे आज 19 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 11 हजार 728 वर पोहचली आहे. ट्विट-

 

 

15 Dec, 02:38 (IST)

हिमाचल प्रदेशात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 49,761 वर पोहचला  आहे.

15 Dec, 02:21 (IST)

पश्चिम बंगालमध्ये TMC च्या कार्यकर्त्यांकडून BSF जवानाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला असून यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

15 Dec, 02:01 (IST)

बिहारमध्ये बायकोवर अॅसिड हल्ला करणाऱ्या नवऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

15 Dec, 01:52 (IST)

गुजरात मध्ये कोरोनाचे आणखी 1120 रुग्ण आढळले असून 11 जणांचा बळी  गेला आहे.

15 Dec, 01:32 (IST)

COVID19 वरील लस प्रथम US मध्ये दिल्याचे  ट्विट डोनाल्ड ट्रंम्प यांनी केले आहे.

15 Dec, 01:25 (IST)

महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 2949 रुग्ण आढळून आल्याने आकडा 18,83,365 वर पोहचला आहे.

15 Dec, 01:12 (IST)

सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना पत्र  लिहिले असून त्यात त्यांनी अन्नत्याचा इशारा दिला आहे.

15 Dec, 24:56 (IST)

आँध्र प्रदेशात नक्षलवाद्यांकडून आदिवासी नागरिकाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली  आहे.

15 Dec, 24:37 (IST)

दिल्लीतील AIIM नर्स युनियनकडून पुकारण्यात आलेल्या संपात रुग्णालयातील परिचारिकांचा पाठिंबा दिला गेला आहे.

15 Dec, 24:26 (IST)

गोवा जिल्हा परिषदेच्या दोन्ही निवडणूकीत भाजपचा विजय झाल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

15 Dec, 24:09 (IST)

दिल्लीत कोरोनाचे आणखी 1376 रुग्ण आढळले असून 60 जणांचा बळी गेला आहे.

14 Dec, 23:58 (IST)

जम्मू-कश्मीर येथे कोरोनाचे आणखी 246 रुग्ण आढळल्याने आकडा 1,16,254 वर पोहचला आहे.

14 Dec, 23:39 (IST)

तमिळनाडू: चेन्नई हवाई सीमाशुल्क यांच्याकडून विमानतळावर  1.23 कोटी रुपयांचे सोने आणि विदेशी चलन जप्त केले असून या प्रकरणी  एकाला अटक करण्यात आली आहे.

14 Dec, 23:27 (IST)

YouTube Down Globally: युट्युब जगभरात डाउन झाले युजर्सची समस्या सोडवण्यासाठी टीम कडून प्रयत्न करण्यात येत आहे.

14 Dec, 23:05 (IST)

हरियाणातील खासदार आणि आमदार यांनी कृषी मंत्री  नरेंद्र तोमर यांची कृषी भवनात भेट  घेतली आहे.

Read more


राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून (सोमवार, 14 डिसेंबर 2020) सुरु होत आहे. विशेष म्हणजे हे अधिवेशन केवळ दोनच दिवस चालणार आहे. कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमी करुन तो दोन दिवस इतका करण्यात आला आहे. आजपासून सुरु होत असलेल्या अधिवेशनात सरकार विरुद्ध विरोधक असासामना रंगण्याची चिन्हे आहेत. कारण, मराठा आरक्षण, कोरोना ते शेतकरी यांसह इतरही विविध मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी (रविवार, 13 डिसेंबर 2020) विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगलाच सामना पाहायला मिळाला. सुरुवातीला विरोधी पक्षातील नेते देवेंद्र फडणीस आणि चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. तर त्याच दिवशी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाविकासआघाडीतील इतर मंत्र्यांच्या उपस्थितत झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले.

हिवाळा सुरु असतानाच राज्यात अनेक ठिकाणी पाऊस कोसळू लागला आहे. मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. असेच वातावरण पुढचे एक दोन दिवस राहिली असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची चिन्हे आहेत. याशिवाय नागरिकांचीही तारांबळ उडणार आहे.

देशात सुरु असलेले शेतकरी आंदोलन अद्यापही कायम आहे. गेली 17 दिवस हे आंदोलन कायम आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही हे आंदोलन शमन्याची चिन्हे अद्याप तरी नाहीत. उलय शेतकरी आंदोलन अधिक तीव्र होताना दिसत आहे. दिवसेंदिवस देशभरातील असंख्य शेतकरी दिल्लीच्या दिशेने कूच करत आहेत.

शेतकऱ्यांनी काल दिवसभर उपोषण केल्यानंतर आजही हे उपोषण होणार आहे. शेतकरी नेते गुरनाम सिंग चादुनी यांनी माहिती देताना म्हटले आहे की, सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शेतकरी उपोषण केले जाणार आहे. तर, 19 डिसेंबरपासून शेतकरी बेमुदत उपोषण आंदोलन करतील अशी अशी योजना होती. मात्र ही योजना तुर्तास रद्द झाल्याचे शेतकरी नेते संदीप गिड्डू यांनी म्हटले आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरस संसर्गाचे संकट अद्यापही कायम आहे. त्यामुळे अद्यापही धोका टळला नाही. नागरिकांनी काळजी घ्यावी असे अवाहन केंद्र आणि राज्य सरकारने केले आहे. जगभरातील विविध क्षेत्रातील बातम्या, घडामोडी यांबाबतचे ताजे तपशील जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now