इंदोरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 411 वर पोहोचली तर आतापर्यंत 37 जणांचा कोरोनामुळे बळी ; 14 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

मुंबई, महाराष्ट्रसह देशा-परदेशातील मराठी बातम्या अवघ्या एका क्लिकवर जाणून घेण्यासाठी मराठी लेटेस्टली पेजला नक्की भेट द्या.

15 Apr, 05:21 (IST)

इंदोरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 411 वर पोहोचली तर आतापर्यंत 37 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

 

15 Apr, 04:28 (IST)

आज सकाळी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची भेट घेतलेले कॉंग्रेसचे आमदार इमरान खेडावाला यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

15 Apr, 04:06 (IST)

ट्रेन चालू होणार या प्रकारची अफवा ज्यांनी पसरविली त्याबद्दलचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच यासदंर्भात चौकशी करून अफवा पसरविणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

15 Apr, 03:46 (IST)

Coronavirus: बांद्रा येथे घडलेल्या घटनेसंदर्भात 800-1000 अज्ञात लोकांविरोधात, आयपीसी कलम 143, 147, 149, 186, 188 अन्वये बांद्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

15 Apr, 03:28 (IST)

पुणे शहरात आज नवे 44 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 324 वर पोहोचली आहे.

 

15 Apr, 03:23 (IST)

कोरोना बाधित गर्भवती महिलेच्या संपर्कात आलेल्या पुण्यातील सोनवणे प्रसूती गृहातील 17 आरोग्य कर्मचारी 3 डॉक्टरांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

 

15 Apr, 02:29 (IST)

कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात एका दिवसात 18 लोकांचा मृत्यू झाला असून 350 नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात आतापर्यंत 2 हजार 684 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, कोरोनामुळे एकूण 178 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच यापैकी 259 जण कोरोनामुक्त झाले आहेत. एएनआयचे ट्वीट- 

 

 

15 Apr, 02:09 (IST)

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण मुंबई आणि पुण्यात आढळून आले आहेत. यामुळे दोन्ही शहरात कोरोना तपासणी केंद्र वाढवले जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

 

15 Apr, 01:58 (IST)

कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला आहे. दरम्यान, त्यांनी कोरोना संदर्भात त्यांनी महत्वाचे मुद्दे मांडले आहेत.  लॉकडाउनच्या काळात शेती विषयक काम थांबणार नाही. तसेच शेती मालाचे दुकानेही सुरु राहणार आहेत. आपण कोरोनाला गांभीर्याने घेत आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच मुंबईत आतापर्यंत 20 ते 25 हजार कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील 10 जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. मात्र, कोरोनानंतर राज्याला अर्थिक संटकाचा सामना करावा लागणार, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. महत्वाचे म्हणजे, कोरोनाचे संकटावर आपण विजय मिळवणारच, असा विश्वासही त्यांनी दर्शवला आहे. 

15 Apr, 01:36 (IST)

दरवर्षी नियमितपणे 14 एप्रिलला भिमसैनिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येत गर्दी करतात. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यावर्षी भिमसैनिकांनी गर्दी न करता घरातच जयंती साजरी केली आहे. यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भिमसैनिकांचे आभार मानले आहेत.

15 Apr, 01:28 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय जाहीर केला. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रात्री 8 वाजता पुन्हा जनतेशी संवाद साधणार आहे. राज्यात लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत वाढविण्यात येईल असे त्यांनी या आधीच सांगितले होते. लॉकडाऊन वाढत असल्याने अडकून पडलेल्या कामगारांचा धीर सुटला आहे. ब्रांद्यात त्यांनी आज मोठ्या संख्येने एकत्र येत तीव्र विरोध नोंदवला होता. मात्र, स्थानिक नेते आणि पोलिसांच्या मध्यस्तीनंतर तेथील गर्दी ओसरली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी फोनच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. वांद्रे परिसरासारख्या घटना कोरोना विषाणूला आमंत्रण देत आहेत. तसेच केंद्राचा महाराष्ट्राला संपूर्ण पाठिंबा आहे, असेही अमित शाह म्हणाले आहेत. एएनआयचे ट्वीट-

 

15 Apr, 01:13 (IST)

कोरोना वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन देशात लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण देशात 3 मे पर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्यात आले आहे. यातच रेल्वेनेही 3 मे पर्यंत प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयामुळे मुंबई येथील वांद्रे परिसरात मुजरांचा आक्रोश पाहायला मिळाला. दरम्यान, स्थानिक नेते आणि पोलिसांच्या मध्यस्तीनंतर तेथील गर्दी ओसरली. यातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री  8 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. दरम्यान ते स्थालंतरीत मजुरांच्या प्रश्नावर चर्चा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

15 Apr, 24:06 (IST)

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. यामुळे संपूर्ण शहरात भितीजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत आज 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, एकूण 204 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईत आतापर्यंत 1 हजार 753 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैंकी 111 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

 

14 Apr, 23:55 (IST)

कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाली आहे. भारतात आतापर्यंत 10 हजार 815 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, कोरोनामुळे एकूण 353 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच यापैकी 1 हजार 190 जण कोरोनामुक्त झाले आहेत. एएनआयचे ट्वीट- 

 

 

 

14 Apr, 23:47 (IST)

कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण देशात 3 मे पर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्यात आले आहे. यातच रेल्वेनेही 3 मे पर्यंत प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयामुळे मुंबई येथील वांद्रे परिसरात मुजरांचा आक्रोश पाहायला मिळाला. दरम्यान, स्थानिक नेते आणि पोलिसांच्या मध्यस्तीनंतर तेथील गर्दी कमी झाली. एएनआयचे ट्वीट- 

 

 

14 Apr, 23:15 (IST)

कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला असताना सागंलीकरांना दिलासा देणारी एक  माहिती समोर आली आहे. एका कोरोनाबाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 26 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैंकी 25 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून एकाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. एएनआयचे ट्विट-  

 

 

14 Apr, 22:18 (IST)

जर एखाद्या परिसरात सलग 28 दिवस एकही कोविड-19 रुग्ण आढळला नाही तर आपण ही कोरोनाची ही साखळी मोडण्यास यशस्वी होऊ अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

14 Apr, 21:26 (IST)

पुण्यातील ससून रुग्णालयातील एका 34 वर्षीय नर्सला कोरोनाची लागण झाली असून तिला तात्काळ आयसोलेशन वॉर्डमध्ये हलविण्यात आले असल्याची माहिती हॉस्पिटले डीन डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली आहे.

14 Apr, 20:47 (IST)

पुण्यात आज 4 नव्या कोविड-19 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना बाधित मृतांची संख्या 38 वर पोहोचली आहे.

14 Apr, 20:23 (IST)

राजस्थान मध्ये 72 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून यात 71 रुग्ण हे जयपूरमधून तर 1 रुग्ण हा झुनझुणू येथील आहे. त्यामुळे या राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 969 वर पोहोचली आहे, अशी माहिती राजस्थान आरोग्य विभागाने दिली आहे.

Read more


कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला होता. आज या लॉकडाऊनचा 21 वा दिवस आहे. हा लॉकडाऊन कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये या पार्श्वभूमीवर ठेवण्यात आला होता. मात्र लोकांच्यया बेजबाबदारपणामुळे ही संख्या देशात वाढतच गेली. ज्याचा परिणाम भारतात गेल्या 24 तासात 905 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 51 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांची संख्या 9352 वर पोहोचली आहे. हा आकडा खूपच धक्कादायक असून याचे अनेक गंभीर परिणाम देशाला भोगावे लागतील. इटली, अमेरिका यांसारख्या देशांसारखी आपली अवस्था होऊ नये म्हणून आज सकाळी 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत.

या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मोदी अनेक महत्त्वाच्या घोषणा करतील. त्याशिवाय देशातील सद्य स्थिती पाहता लॉकडाऊन वाढण्याची घोषणा होण्याची देखील शक्यता आहे. देशातील उद्योगधंदे, अर्थव्यवस्था या सर्व महत्त्वाच्या गोष्टींबाबत नरेंद्र मोदी काय सांगतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

त्यासोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आज काही महत्त्वाच्या घोषणा करणार असल्याचे सांगितले होते. पंतप्रधान मोदींच्या कॉन्फरन्सवर उद्धव ठाकरे काही निर्णयापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात 352 नवीन कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्ण आणि 11 मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात एकूण सकारात्मक घटनांची संख्या 2334 वर पोहचली आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now