विदर्भातील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना 68 कोटी 94 लाख रुपये आर्थिक मदत;12 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
दिल्ली येथे महरौली मतदारसंघातून निवडून आलेले आम आदमी पक्षाचे उमेदवार नरेश यादव यांच्या ताफ्यावर मंगळवारी रात्री उशिरा गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यामध्ये पक्षाच्या एका कार्यकर्ता ठार झाला आहे.
महाराष्ट्र सरकारकडून विदर्भातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 68 कोटी 94 लाख 27 हजार रुपयाची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत माहिती दिली. ज्या शेतकऱ्यांनी पिकासाठी कर्ज घेतले नाही, मात्र अतिवृष्टीमुळे त्यांच्या पिकांचे किमान 33 टक्के नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे.
Coronarvirus आजाराच्या पार्श्वभूमीवर सध्या रुग्णालयात पुणे व मुंबई येथे प्रत्येकी एक रुग्ण निरिक्षणाखाली आहे. अशा 41 प्रवाशांपैकी 39 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 27,894 प्रवाश्यांची तपासणी करण्यात आली- आरोग्यमंत्री
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ साहित्यिका अनुराधा पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तसेच मराठी साहित्य निर्मितीमध्ये लक्षणीय कामगिरीसाठीच्या श्री.पु. भागवत पुरस्कारासाठी पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाची निवड करण्यात आली आहे. राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी या नावांची घोषणा केली आहे.
नवा झेंड्यात शिवरायांच्या राजमुद्राचा वापर केल्यामुळे निवडणूक आयोगाने मनसेला नोटीस बजाविली आहे. या नोटीसला आता मनसे काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही संघटनांनी निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार, निवडणूक आयोगाकडून मनसेला ही नोटीस बजावण्यात आली आहे.
सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर वेंडेल रॉड्रिक्स यांचे निधन झाले आहे. वेंडेल रॉड्रिक्स यांना 2014 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. रॉड्रिक्स यांचा आज त्यांच्या गोव्यातील घरी मृत्यू झाला.
ईव्हीएममध्ये बिघाड होऊ शकतो, पण त्यात छेडछाड शक्य नाही, असे स्पष्टीकरण मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिले आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये छेडछाड करणे शक्य नाही, त्यामुळे पुन्हा बॅलेट पेपरकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही, असेही अरोरा यानी सांगितले आहे.
राज्यात दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करण्यासाठी आगामी अधिवेशनात कायदा करणार असल्याची घोषणा मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे. त्यानुसार, इंग्रजीसह सर्व भाषिक शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यात येणार आहे.
17 दिवसांच्या काळात राज्यात तब्बल 2 लाख 33 हजार 738 नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला आहे. राज्यात प्रजासत्तादिनी ही योजना सुरु करण्यात आली होती. शिवभोजन योजना सुरू झाल्यानंतर पहिल्या आठ दिवसांच्या कालावधीतच शिवभोजन थाळीचा लाभ घेणाऱ्यांची संख्या 1 लाखांहून अधिक होती.
शिवसेनेत हिंमत असेल तर पुन्हा महाराष्ट्र विधानसभा निवडणुक झाली तर शिवसेनेने ती निवडणुक एकटी लढवून दाखवावी, असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला.
मुंबईतील महत्त्वाचे धार्मिक व पर्यटन स्थळ असलेल्या हाजी अली दर्गाचे नुतनीकरण व सौंदर्यीकरणाचे काम लवकरात-लवकर सुरू करण्याचे निर्देश मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत.
-श्री. ए. बी. उन्हाळे सहसचिव मदत व पुनर्वसन यांची बदली आयुक्त अन्न व औषध प्रशासन मुंबई या पदावर श्रीमती पल्लवी दराडे यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. -श्री लक्ष्मी नारायण मिश्रा, आयुक्त पशुसंवर्धन यांची बदली जिल्हाधिकारी रत्नागिरी या पदावर श्री एस एस चव्हाण यांच्या जागी नियुक्ती केली आहे. -श्रीमती पवनीत कौर, यांची बदली आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. -डॉक्टर माधवी खोडे चवरे, संचालक , वस्त्रोद्योग, नागपूर यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, जळगाव महानगरपालिका, जळगांव येथे करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील महाविद्यालयांमध्ये येत्या 19 फेब्रुवारी पासून दररोज राष्ट्रगीत म्हणणे अनिवार्य असल्याची माहिती महाराष्ट्र मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून टोल नाक्यावर डिजिटल पद्धतीला चालाना देण्यासाठी 15 ते 29 फेब्रुवारी पर्यत 15 दिवसांसाठी फास्टॅगसाठी वसूल करण्यात येणारा शुल्क माफ केला आहे.
दिल्ली: निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची पटियाला कोर्टाबाहेर आशा देवी आणि महिला सामाजिक कार्यकर्त्या योगिता भयाना यांनी मागणी करत आहेत.
सिडको प्रकल्पातील ग्राहकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दिलासा देण्यात आला आहे. तर सिडको प्रकल्पातील 2500 घर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता पण आता ग्राहकांना घराची कागदपत्र आणि पैसे भरण्यासाठी 30 जून पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.
दिल्ली येथे महरौली मतदारसंघातून निवडून आलेले आम आदमी पक्षाचे उमेदवार नरेश यादव यांच्या ताफ्यावर मंगळवारी रात्री उशिरा गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यामध्ये पक्षाच्या एका कार्यकर्ता ठार झाला आहे. तर ही घटना नरेश यादव हे निवडून आल्यानंतर मंदिरातून घरी परत जाताना घडली आहे. तसेच अजून एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई- मांडवा रो रो सेवेला मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होणार आहे. रो-रो जहाज हे 13 फेब्रुवारीला मुंबई बंदरात दाखल होणार असून मुंबई-मांडवा दरम्यान प्रवास सुखकर होणार आहे. तसेच अलिबाग येथे जाण्यासाठी एका तासाचा अवधी लागणार आहे. ग्रीसमधील एस्कॉयर शिपिंग कंपनीकडून या जहाजाची बांधणी करण्यात आली आहे.
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या.
म्हाडाच्या कोकण मंडळाची 9140 घरांसाठी लॉटरी फेब्रुवारीला पहिल्या आठवड्यात काढण्यात येणार होती. पण या घरांमध्ये पोलिसांसाठी आणि चतुर्थी श्रेणीमधील कर्मचाऱ्यांसाठी दहा टक्के घरे राखीव ठेवण्यात यावीत असा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रस्तावाला गृहविभागाची मंजुरी आवश्यक असल्याने या लॉटरीची जाहिरात आणखी महिनाभर लांबणीवर पडणार असल्याची माहिती म्हाडाच्या सुत्रांकडून देण्यात आली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)