आपात्कालीन क्रमांकावर फोनकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हानी पोहचवण्याचे भाष्य करणाऱ्या एका व्यक्तीला अटक; 10 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

मुंबई, पुणे सह देशापरदेशातील महत्त्वाच्या घडामोडी,ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी मराठी लेटेस्टली ला नक्की भेट द्या.

11 Aug, 05:24 (IST)

आपात्कालीन क्रमांकावर फोनकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हानी पोहचवण्याची भाषा करणाऱ्या 33 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पीटीआयचे ट्वीट-  

 

 

11 Aug, 04:32 (IST)

पुणे शहरात नव्याने 761 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, एकूण संख्या 66,727 झाली आहे. तर 1,499 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सध्या 15,043 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील एकूण तपासणी आता 3,24,721 झाली असून आज 5,133 टेस्ट घेण्यात आल्या.

 

 

11 Aug, 04:00 (IST)

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आर्मीच्या आर अँड आर हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती सूत्रांकडू मिळत आहे.

11 Aug, 03:50 (IST)

मणिपूर येथे आणखी 100 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 853 वर पोहचली आहे. ट्वीट- 

 

 

 

 

11 Aug, 03:15 (IST)

बिहारमध्ये आलेल्या पुरामुळे 16 जिल्ह्यातील 74 लाख 40 हजार लोक प्रभावित झाले आहेत. पीटीआयचे ट्वीट- 

 

 

11 Aug, 02:53 (IST)

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाची चौकशीसाठी ईडीकडून गेल्या अनेक तासांपासून चौकशी सुरु होती. आता ती ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडली आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

11 Aug, 02:19 (IST)

गोव्यात आज 317 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे गोव्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 9 हजार 29 इतकी झाली आहे.

 

11 Aug, 02:13 (IST)

हरियाणामध्ये आज 794 नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे.

 

11 Aug, 01:50 (IST)

पुणे शहरात आज नव्याने ७६१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ६६ हजार ७२७ इतकी झाली आहे.

11 Aug, 01:29 (IST)

महाराष्ट्रात आज 9,181 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून 293 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

11 Aug, 01:19 (IST)

आंध्रप्रदेशमध्ये आज 7,665 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून 80 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

11 Aug, 01:08 (IST)

कोलकातामधील पोलॉक स्ट्रीटवरील इमारतीत आग लागली असून अग्निशामक दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

 

11 Aug, 24:57 (IST)

तामिळनाडूमध्ये आज 5,914 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 114 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

11 Aug, 24:27 (IST)

धारावीत आज 9 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून धारावीतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 2626 वर पोहोचली आहे.

10 Aug, 23:29 (IST)

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी कोरोनावर मात केली असून त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

10 Aug, 23:03 (IST)

सचिन पायलट यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वड्रा यांची दिल्ली येथे भेट घेतली.

 

10 Aug, 22:33 (IST)

राजनाथ सिंग Army च्या R&R Hospital ला भेट देऊन माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या प्रकृतीची विचारपूस करणार  आहेत. दरम्यान काही वेळापूर्वी प्रणब मुखर्जी कोविड 19 पॉझिटीव्ह असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.  

10 Aug, 21:11 (IST)

अभिनेता संजय दत्त यांना वांद्रे येथील लीलावती रूग्णालयातून आज (10 ऑगस्ट) डिस्चार्ज देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी संजय दत्त याला श्वसनाचा त्रास होत असल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 

10 Aug, 21:00 (IST)

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिलेल्या वक्तव्यामध्ये अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी CBI ला FIRदाखल करावं लागणं ही त्यांची मजबुरी असल्याचं म्हटलं आहे. सीबीआय ही केंद्र सरकारची एजंसी असल्याने अशाप्रकरणामध्ये केंद्र सरकारची मजबूरी असते. बिहार सरकारने शिफारस केली होती. याप्रकरणाशी बिहार सरकारचा संबंध काय? असा सवाल त्यांनी विचारला आहे. 

10 Aug, 19:57 (IST)

आज दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली विद्यापीठांना  2017 व 2018 साली उत्तीर्ण डॉक्टरांना13 ऑगस्ट पूर्वी ईमेल द्वारा digital degree certificates द्यावीत असे आदेश दिले आहेत.

Read more


महाराष्ट्रात अंतिम वर्षाच्या आणि अंतिम सत्राच्या परीक्षा कोरोना संकटकाळामध्ये रद्द करण्याच्या निर्णयावर सरकार ठाम असल्याने आता युवासेना यांच्या काही विद्यार्थी, शिक्षक, पालक संघटना उच्च न्यायालयामध्ये पोहचल्या आहेत. आज या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. त्याकडे महाराष्ट्रासह देशभरातील विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान मुंबईमध्ये मागील आठवडाभर मुसळधार कोसळणार्‍या पावसाने थोडी उसंत घेतली आहे. आज हवामान वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई शहरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. मात्र वातावरण ढगाळ राहणार आहे. मुंबई शहर, उपनगरांमध्ये तुरळक पाऊस बरसेल.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

कोरोना व्हायरसच्या फैलावावर आता प्रशासनाला हळूहळू नियंत्रण मिळवण्यास यश येताना दिसत आहे. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोविड 19 च्या रिकव्हरीने म्हणजेच बरे होऊन घरी परतणार्‍या लोकांची संख्या 15 लाखांच्या पार गेली आहे. तर संसर्ग अजूनही 80% पेक्षा अधिक असणार्‍या राज्यांमध्ये 10 राज्यांचा समावेश आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now