Thane Crime: सोन्याच्या दुकानात नोकराने 1.30 कोटींचे दागिने केले लंपास, आरोपीला अटक

या घटनेनंतर पोलिसांनी २९ वर्षीय आरोपीला अटक केले होते. सोन्याच्या दुकानात चोरी झाल्याची पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आहे.

Gold | fille Image

Thane Crime: ठाण्यातील नौपाडा येथील एका सोन्याच्या दुकानातून 1.30 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी 29 वर्षीय नोकराला अटक केले आहे. सोन्याच्या दुकानात चोरी झाल्याची  पोलिस ठाण्यात नोंद  करण्यात आहे. पोलिसांनी आरोपीला गुजरात येथून अटक केले. ठाण्यातील या चोरीच्या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान अनेक ठिकाणी चोरीच्या घटना वाढत आहे. (हेही वाचा-  धक्कादायक! महिलेच्या शरिराचे दोन तुकडे केलेला मृतदेह रेल्वेत आढळला, इंदूर मधील घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू)

मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत पुनमिया यांच्या मालकियच्या विरासत ज्वेलर्समध्ये ही घटना घडली. ११ मे रोजी विरासत ज्वेलर्समध्ये चोरीची घटना घडल्याची पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. विरासत ज्वेलर्समध्ये काम करणारा नोकर विशालसिंग राजपूत याने दुकानात चोरी केली. गेल्या अडीज महिन्यापासून तो दुकानात काम करत होता.

एके दिवशी मालक यशवंत यांने सिध्दार्थ ज्वेलर्स या दुसऱ्या ज्वेलर्सच्या दुकानातून सोन्याचे दागिने आणायला सांगितले. राजपूतने ते सोने घेतले आणि त्याने ते मालक यशवंत याला दिले नाही. त्यानंतर काही दिवशांनी पुन्हा संधीचा वापर करत यशवंत वॉशरुममध्ये असताना आणि दुसरा कर्मचारी ग्राहकामध्ये व्यस्त असताना आणखी दागिन्यांची चोरी केली आणि घटनास्थळावरून फरार झाला.

राजपूत परत न आल्याने मालकाला संशय झाला आणि त्याने थेट पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी या प्रकरणी नोंद घेतली. राजपूत आणि त्याच्या साथीदाराने यापूर्वीही असाच गुन्हा केल्याचा नोंद आहे. एलटी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे राजपूतने दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वापरला जेणे करून त्याला पोलिसांनी पकडायला नको. परंतु पोलिसांनी महिना भरातच आरोपीला अटक केले.