New Delhi Crime: गुरुग्राम येथील किंग क्लबच्या मालकावर लोखंडी रॉडने हल्ला, कारवर गोळीबार; अज्ञांताविरुध्दात गुन्हा दाखल

नवी दिल्लीती गुरुग्राम येथील किंग क्लबच्या मालकावर अज्ञात हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने हल्ला केला आणि त्याच्या कारवर गोळ्या झाडल्या.

New Delhi

New Delhi Crime: नवी दिल्लीती गुरुग्राम येथील किंग क्लबच्या मालकावर  अज्ञात हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने हल्ला केला आणि त्याच्या कारवर गोळ्या झाडल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८.५३ वाजता फतेहपूर बेरी पोलिस ठाण्यात कंट्रोल रुममध्ये पीडितेचा भाऊ याचा फोन आला. डेरा गावातील नंदू मोहल्ला येथील रहिवासी आहे.  सुंदर हा क्लबमधून त्याच्या घराकडे जात असताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. सुंदरच्या कारचा, पांढऱ्या रंगाच्या हुंडाई क्रेटाचा HR-51 (फरीदाबाद, हरियाणा) नोंदणी क्रमांक असलेल्या दोन कारने पाठलाग केला. (हेही वाचा- पत्रकाराला मारहाण केल्या प्रकरणी दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल, कुर्ला परिसरातील घटना)

मिळालेल्या माहितीनुसार,  क्लबच्या आर्थिक वादातून हल्लेखोरांनी हल्ला केल्याचे समोर आले आहे. पूर्ववैमन्यसातून सुंदरवर हल्ला केल्याचे संशय पोलिसांनी घेतला आहे. या प्रकरणी पोलिस पुढील तपासणी करत आहे. पोलिसांना घटनास्थळावरून तीन रिकामी काडतुसे जप्त केली. सुंदरला गंभीर दुखापत झाली नाही. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हल्ल्यातील संशयिताना पकडण्यासाठी पोलिस कंबर कसून चौकशी करत आहे. परिसरात या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.पोलिसांनी अज्ञांताविरुध्दात गुन्हा दाखल करून घेतला आहे.  हल्लेखोरांना लवकरच ताब्यात घेतले जाईल अशी माहिती पोलिासांनी दिली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif