Begusarai: धक्कादायक! एक रोपटे उपटले म्हणून 12 वर्षीय मुलीला रॉकेल ओतून जाळले; बिहारच्या बेगूसराय येथील घटना

यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात असताना बिहारच्या (Bihar) बेगूसराय (Begusarai) जिल्ह्यातील बरौनी येथून सर्वांनाच हादरून टाकणारी माहिती समोर आली आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

समाजात वावरत असताना अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार, मानसिक त्रास, विनयभंग, पिळवणूक अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात असताना बिहारच्या (Bihar) बेगूसराय (Begusarai) जिल्ह्यातील बरौनी येथून सर्वांनाच हादरून टाकणारी माहिती समोर आली आहे. केवळ एक रोपटे उपटले म्हणून शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने 12 वर्षीय मुलीवर रॉकेल ओतून जिवंत जाळून दिले आहे. या आगीत भयंकर जखमी झालेल्या अल्पवयीन मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी बरौनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही शिवरौना गावातील रहिवाशी आहे. दरम्यान, आपल्या घराबाहेर खेळत असताना पीडिताने नकळत शेजारी राहणाऱ्या आरोपी सिंकदर यादवच्या घरी लावण्यात आलेले भाजीपाल्याचे रोपटे उपटून टाकले. यावर संतापलेल्या सिंकदर आणि त्याच्या पत्नीने पीडित मुलीला बेदम मारहाण केली. इतके करूनही मन भरले नाही, तेव्हा त्यांनी पीडित मुलीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. या आगीत पीडित मुलगी गंभीर भाजली. त्यानंतर तिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरु असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर मिळत आहे. यासंदर्भात इंडिया टूडेने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- उत्तर प्रदेश: रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्यास 5 वर्षात दुप्पट रक्कम मिळवण्याचे स्वप्न दाखवत शेकडो लोकांना घातला गंडा

या घटनेनंतर संपूर्ण देशातून संतापजनक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याप्रकरणी आरोपी आणि त्याच्या पत्नीविरोधात बरौनी पोलीस ठाण्यात शनिवारी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तपासानंतरच या संपूर्ण घटनेबाबतचे सत्य समोर येईल. या दोन्ही कुटुंबांमध्ये आधीपासूनच वाद सुरू असल्याची माहिती बरौनीचे एसओ सुरेंद्र सिंह यांनी दिली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif