Navjot Singh Sidhu Released: 10 महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर आले नवज्योत सिद्धू; म्हणाले, 'लोकशाही बेड्यांमध्ये आहे'

गेल्या वर्षी 20 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूला एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांनी पटियाला येथील न्यायालयात शरणागती पत्करली.

Navjot Singh Sidhu (PC - ANI/Twitter)

Navjot Singh Sidhu Released: पंजाब काँग्रेसचे माजी प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांची शनिवारी दहा महिन्यांनंतर पतियाळा सेंट्रल जेलमधून सुटका करण्यात आली. 59 वर्षीय काँग्रेस नेते सिद्धू यांना 1988 च्या रोड रेज प्रकरणात एक वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. गेल्या वर्षी 20 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूला एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांनी पटियाला येथील न्यायालयात शरणागती पत्करली.

सकाळपासूनच पटियाला तुरुंगाबाहेर त्यांचे समर्थक जमा होऊ लागले होते. यावेळी ढोलकी वाजवणाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले. यानंतर सिद्धूच्या सुटकेची प्रतीक्षा सुरू झाली. आधी त्यांना दुपारी 12 वाजता सोडण्याचे सांगण्यात येत होते, परंतु पेपर वर्क पूर्ण होईपर्यंत संध्याकाळ झाली. सिद्धू संध्याकाळी 6 नंतर तुरुंगातून बाहेर आले. समर्थकांनी दिलेल्या घोषणांवर सिद्धू यांनी वाकून नमस्कार केला. (हेही वाचा - PM Modi's Degree Case: पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पदवी असेल तर ती का दाखवली जात नाही? अरविंद केजरीवाल यांचा सवाल)

बाहेर आल्यानंतर सिद्धू यांनी प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले की, सत्य दडपण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकत नाही. आज लोकशाही बेड्यांमध्ये अडकली आहे. पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट आणण्याचे षडयंत्र रचले जात आहे. अल्पसंख्याकांना लक्ष्य केले जात आहे. जर तुम्ही पंजाबला कमकुवत करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही कमजोर व्हाल. आता लोकशाही नावाची गोष्ट राहिलेली नाही.

नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले की, मला दुपारच्या सुमारास सोडण्यात येणार होते. पण त्यांनी उशीर केला. प्रसारमाध्यमांनी तेथून जावे अशी त्यांची इच्छा होती. या देशात जेव्हा जेव्हा हुकूमशाही आली तेव्हा क्रांतीही आली आणि यावेळी त्या क्रांतीचे नाव आहे राहुल गांधी. ते या सरकारला हादरवेल.