Punjab Elections 2022: कॅबिनेट मंत्र्याचा पराभव करणाऱ्या Narinder Kaur ठरल्या पंजाबच्या सर्वात तरुण आमदार
अवघ्या 27 वर्षांच्या नरिंदर कौर भाराज यांनी निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज आणि कॅबिनेट मंत्री विजय इंदर सिंगला यांचा जवळपास 36,000 मतांनी पराभव केला.
Punjab Elections 2022: पंजाब निवडणुकीत आम आदमी पक्षाने (AAP) मोठा विजय मिळवला. त्यांच्या उमेदवारांनी विरोधी पक्षाच्या उमेदवारांना कडवी टक्कर दिली. गुरुवारी पंजाबमध्ये निवडून आलेल्या आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. यामध्ये मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्याशिवाय 117 नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली.
यावेळी नरिंदर कौर भराज (Narinder Kaur Bharaj) चर्चेचा विषय ठरल्या. वास्तविक नरिंदर कौर या पंजाबच्या सर्वात तरुण आमदार आहेत. 27 वर्षीय नरिंदर यांनी काँग्रेस नेते आणि कॅबिनेट मंत्री विजय इंदर सिंगला यांचा सुमारे 36,000 मतांनी पराभव केला. (हेही वाचा - Yogi Adityanath Swearing-in Ceremony: योगी आदित्यनाथ 21 मार्चला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता; लखनौमध्ये BJP आयोजित करत आहे भव्य शपथविधी सोहळा)
दरम्यान, पंजाबमध्ये 117 जागांवर निवडणुका झाल्या. त्यापैकी आपने 92 जागा जिंकल्या आहेत. पंजाब निवडणुकीत यावेळी आणखी एक खास गोष्ट पाहायला मिळाली. येथे विजयी झालेल्या सर्व आमदारांपैकी एकूण 11 आमदार असे आहेत, ज्यांचे वय 35 वर्षांपेक्षा कमी आहे. त्यांच्यामध्ये केवळ 27 वर्षांच्या नरिंदर कौर भारजा यांची सर्वाधिक चर्चा झाली. नरिंदर कौर भाराज यांनी संगरूरमधून विजय इंदर सिंगला आणि भाजपच्या अरविंद खन्ना यांचा पराभव केला.
नरिंदर या शेतकरी कुटुंबांतील आहेत. अवघ्या 27 वर्षांच्या नरिंदर कौर भाराज यांनी निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज आणि कॅबिनेट मंत्री विजय इंदर सिंगला यांचा जवळपास 36,000 मतांनी पराभव केला. नरिंदर यांनी 2014 पासून राजकारणात पाऊल ठेवले होते. पंजाब विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर सर्वत्र नरिंदर यांचं कौतुक होत आहे.