Kartarpur Corridor: आनंद द्विगुणित झाल्याचे सांगत Narendra Modi नी मानले Imran Khan यांचे आभार
कर्तारपूर कॉरीडोर हा भारतातील पंजाब मधील डेरा बाबा नानक यांचे देवस्थान आणि पाकिस्तानातील नारोवर जिल्ह्यामधील दरबार साहेब, म्हणजेच कर्तारपूर साहेब, जिथे गुरुनानक देव यांनी आयुष्यातील शेवटचे क्षण घालवले अशा दोन स्थानांना जोडण्याचं कार्य करतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्तारपूर कॉरीडोर हा भारतीयांसाठी खुला करून करून देण्याबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे आभार मानले आहेत. कर्तारपूर कॉरीडोर हा भारतातील पंजाब मधील डेरा बाबा नानक यांचे देवस्थान आणि पाकिस्तानातील नारोवर जिल्ह्यामधील दरबार साहेब, म्हणजेच कर्तारपूर साहेब, जिथे गुरुनानक देव यांनी आयुष्यातील शेवटचे क्षण घालवले अशा दोन स्थानांना जोडण्याचं कार्य करतो.
शीख धर्माची स्थापना करणारे गुरुनानक देव यांच्या 550 व्या जन्मतिथीचं औचित्य साधून या कॉरिडोरचे उदघाटन करण्यात आले. 4.5 किलोमीटर लांबीचा हा रस्ता वापरून हजारो शीख भाविक दरबार साहेब मध्ये जाऊन दर्शनाचा लाभ घेऊ शकतील. बेर साहिब गुरुद्वाराच्या दर्शनानंतर सकाळी मोदींनी चेक पोस्टचे उदघाटन केले. त्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या समवेत काही निवडक भाविकांचा जथा कॉरीडोरकडे रवाना झाला. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल, तसेच गुरदासपूरचे खासदार सनी देओल ही मंडळीही उपस्थित होती. (हेही वाचा. Ayodhya Judgement: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर मात्र आम्हांला अपेक्षित निकाल आला नाही: मुस्लिम पक्षकार)
यासंदर्भात बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले,''जेव्हा गुरु नानकांनी कर्तारपूर सोडले होते तेव्हा कोणालाच कल्पना नव्हती की ते समाजाला एक नवीन दिशा दाखवतील. त्यांचं अख्खा आयुष्य हे एक प्रेरणा आहे.'' याच वेळी इम्रान खान यांच्याबद्दल मोदी म्हणाले,''समस्त भारतीयांच्या भावनांचा आदर केल्याबद्दल मी इम्रान खान यांचे आभार मानतो. गुरु नानकांच्या 550 व्या जयंती निमित्त खुला झालेल्या या कॉरीडोर मुळे आमचा आनंद आज द्विगुणित झाला आहे.''
गुरुनानकांच्या शिकवणीचे पालन करण्याची आपण प्रतिज्ञा केली पाहिजे असेही ते पुढे म्हणाले.