तेलुगु देशम पक्षाचे माजी खासदार, कलाकार N. Sivaprasad  यांचे आज निधन, वयाच्या ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

शिवप्रसाद 68 वर्षांचे होते. महत्वाचे म्हणजे मूत्रपिंडाच्या तीव्र आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात (Apollo Hospital) उपचार सुरू होते.

N Siva Prasad (ANI)

तेलगू देशम पक्षाचे (TDP) ज्येष्ठ नेते आणि चित्तूरचे (Chittoor) माजी खासदार एन शिवा प्रसाद (N Siva Prasad) यांनी आज शनिवारी अखेरचा श्वास घेतला आहे. शिवप्रसाद 68 वर्षांचे होते. महत्वाचे म्हणजे मूत्रपिंडाच्या तीव्र आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात (Apollo Hospital) उपचार सुरू होते. तेलगू देशम पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार, सिने कलाकार, दिग्दर्शक डॉ. एन शिवा प्रसाद यांना पक्ष श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या कुटुंबावरील सदस्यावर दुखाचे डोंगर कोसळले आहे. याचे आम्ही शोक व्यक्त करतो, असे तेलगू देशम पक्षाने एका निवेदनात म्हटले आहे.

नरमल्ली शिवप्रसाद यांनी अभिनेता म्हणूनही काम केले आहे. एन शिवप्रसाद आंध्र प्रदेशाला विशेष दर्जा मिळावे, यासाठी कधीकधी नारद म्हणून किंवा कधी सुदामा म्हणून संसदेत जात होते. तसेच आंध्रप्रदेशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात यावा, याचीही त्यांनी मागणी त्यांनी केली होती. लोकसभा निवडणुकीत 2009 मध्ये आंध्र प्रदेशमधील चित्तूर मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले होते. शिवप्रसाद हे पेशाने डॉक्टर होते. शिवप्रसाद यांनी तेलगू चित्रपटातही काम केले आहे. 2005 मध्ये त्यांना अभिनयासाठी आंध्र प्रदेशचा प्रसिद्ध 'नंदी' पुरस्कारही मिळाला होता. हे देखील वाचा- Maharasta Assembly Election 2019: ईव्हीएम डोळ्यासमोर ठेवूनच मतदान आणि मत मोजणी यात 3 दिवसाचे अंतर? छगन भुजबळ यांच्याकडून शंका व्यक्त

आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील पोटीपल्ले गावात 11 जुलै 1951 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांनी तिरुपतीच्या एसव्ही मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचा पाठपुरावा केला होता. शिव प्रसाद राजकारणात येण्यापूर्वी थिएटर आणि चित्रपटात काम करत होते.