Murder Caught on Camera in Kanpur: वैयक्तिक वैमनस्यातून तरुणाची भररस्त्यात हत्या, चार जण पोलिसांच्या ताब्यात (Watch Video)
युपी येथील गुन्हेगारी थांबायचे नावचं घेत नाही. दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असल्याने नागरिक चिंतेत आहे. एका तरुणाची भररस्त्यात हत्या केली आहे. ही घटना एकाने कॅमेऱ्यात कैद केली असून घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Murder Caught on Camera in Kanpur: उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात धक्कादायक घटना घडली आहे. युपी येथील गुन्हेगारी थांबायचे नावचं घेत नाही. दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असल्याने नागरिक चिंतेत आहे. एका तरुणाची भररस्त्यात हत्या केली आहे. ही घटना एकाने कॅमेऱ्यात कैद केली असून घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाच जणांनी मिळून तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुणाने प्राण गमावले. (हेही वाचा- मुंबई लोकलमध्ये दंड ठोठावला म्हणून प्रवाशाची तिकीट तपासकाला हॉकी स्टिकने मारहाण)
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात एका तरुणाला रस्त्यात पाच जणांनी बेदम मारहाण केली. पाच जणांनी तरुणाला लाथा बुक्क्याने आणि काठीने मारहाण केली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साहिल पासवान असं हल्ला करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेची तात्काळ माहिती पोलिसांना देण्यात आली. वैयक्तिक वैमनस्यातून तरुणाची हत्या केल्याचे समोर आले आहे.
कानपूर येथील हत्येचा व्हिडिओ
पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पीडितेला ताब्यात घेतले आणि त्याला रुग्णालयात दाखल केले. परंतु पीडितेचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. कानपूर पोलिसांनी या घटनेअंतर्गत चार जणांना अटक केले. विशाल, विक्रम, विवेक आणि अक्षय या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस पाचव्या आरोपीच्या शोधात आहे. जो सद्या फरार आहे.