Rape: क्रुरतेचा कळस ! सुरतमध्ये 11 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या, दोघांना अटक
पोलिसांनी सांगितले की, त्याच इमारतीतील दोन तरुणांना ती तिच्या सात वर्षांच्या भावासोबत एकटी आढळली. त्यानंतर तरुणांनी तिला त्यांच्या खोलीत नेले, जिथे त्यांनी बलात्कार करून तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर आरोपींनी खोलीला कुलूप लावून पळ काढला.
सुरत (Surat) जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी एका 11 वर्षीय मुलीवर दोन शेजाऱ्यांनी बलात्कार (Rape) करून तिची हत्या (Murder) केली. पोलीस सूत्रांनी सांगितले की, मुलीचे आई-वडील दोघेही रोजंदारीवर होते, घटनेच्या वेळी घरी नव्हते. रविवारी दुपारी पोलिसांनी सांगितले की, त्याच इमारतीतील दोन तरुणांना ती तिच्या सात वर्षांच्या भावासोबत एकटी आढळली. त्यानंतर तरुणांनी तिला त्यांच्या खोलीत नेले, जिथे त्यांनी बलात्कार करून तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर आरोपींनी खोलीला कुलूप लावून पळ काढला. पोलिसांनी सांगितले की, मुलीचे आई-वडील घरी परतले असता त्यांची मुलगी बेपत्ता असल्याचे लक्षात आल्यावर ही घटना उघडकीस आली. त्यांनी इमारतीत राहणाऱ्या इतर कुटुंबांकडे चौकशी केली.
तेव्हा एका रहिवाशांना एका बंद खोलीतून एका मुलीचा ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी दरवाजा तोडला असता मुलगी जमिनीवर पडलेली दिसली. मुलीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींना पकडण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. हेही वाचा Dehradun: माहेरी गेलल्या पत्नीने परत येण्यास दिला नकार, दुखावलेल्या पतीने रागाच्या भरात पेटवली 12 वाहने
आम्ही या घटनेत सहभागी असलेल्या दोन संशयित तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करत आहोत. ज्या खोलीत मुलगी सापडली त्याच खोलीत दोघेही राहत होते. ही घटना घडली तेव्हा पीडितेचे आई-वडील दिवसा काम करत होते. आरोपीही याच इमारतीतील रहिवासी आहेत. एकाच इमारतीत दहा कुटुंबे राहतात, ते म्हणाले.
(The above story first appeared on LatestLY on Feb 21, 2022 04:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

