Woman Buys Liquor in Delhi: 'हमारे को दवाओं से नहीं, पेग से असर होगा'; दिल्लीत दारू खरेदीसाठी आलेल्या महिलेचा अजब दावा, Watch Video
राजधानी दिल्लीतील विविध दुकानांवर महिला दारू खरेदी करण्यासाठी उभ्या असलेल्या दिसल्या. शिवपुरी गीता कॉलनीतील एका दुकानाबाहेर दारू खरेदीसाठी उभ्या असलेल्या महिलेने सांगितले की, कोविड-19 च्या इंजेक्शनमुळे माझा फायदा होणार नाही, तर दारूने होईल. तसेच आमच्यावर कोणत्याही औषधांचा परिणाम होणार नाही, तर पेगचा परिणाम होऊ शकतो.
Woman Buys Liquor in Delhi: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज रात्री 10 ते सोमवारी सायंकाळी 5 या वेळेत दिल्ली शहरात लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या काळावधीत दिल्ली शहरातील दारूची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. केजरीवाल यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर शहरातील दारू दुकानांमध्ये प्रचंड गर्दी झाली आहे. दारू खरेदीसाठी मोठ्या संख्येने लोक दारू दुकानांच्या बाहेर गर्दी करत आहेत. यादरम्यान, बर्याच लोकांनी मद्य आवश्यकतेबद्दल अतिशय रंजक गोष्टी सांगितल्या आहेत. दरम्यान, यावेळी राजधानी दिल्लीतील विविध दुकानांवर महिला दारू खरेदी करण्यासाठी उभ्या असलेल्या दिसल्या. शिवपुरी गीता कॉलनीतील एका दुकानाबाहेर दारू खरेदीसाठी उभ्या असलेल्या महिलेने सांगितले की, कोविड-19 च्या इंजेक्शनमुळे माझा फायदा होणार नाही, तर दारूने होईल. तसेच आमच्यावर कोणत्याही औषधांचा परिणाम होणार नाही, तर पेगचा परिणाम होऊ शकतो.
महिलेने पुढे बोलताना सांगितले की, पुढील सहा दिवस मी लॉकडाऊनमध्ये आहे, म्हणून मद्य खरेदीसाठी आली आहे. कोरोना कालावधीत दारूचे महत्त्व विचारले असता ही म्हणाली की, दारूमध्ये अल्कोहोल असते. त्यामुळे कोरोना इंजेक्शनचा फायदा होणार नाही, अल्कोहोलचा फायदा होईल. जे लोक मद्यपान करतील, ते सर्व ठीक राहतील, असा अजब दावाही केला. (वाचा - Mewalal Chaudhry Dies Due to Covid-19: बिहारचे माजी शिक्षणमंत्री आणि जेडीयू नेते मेवालाल चौधरी यांचे कोरोनामुळे निधन)
या महिलेने सांगितले की, लॉकडाउनचा मद्यपान करणाऱ्यांवर परिणाम होईल. मद्यपान करणाऱ्यांना औषधांचा कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, त्यांच्यावर पॅकचा परिणाम होईल. 35 वर्षापासून तिने दुसरा कोणताही डोस घेतला नाही. मी दररोज एक पॅक घेते. त्यानंतर काहीच नाही. दिल्लीत लॉकडाऊनमध्ये दारूचे दुकान उघडले पाहिजेत. दारूचे दुकान सुरू राहिले, तर लोकांना डॉक्टरांकडे जावे लागणार नाही.
याशिवाय एका युवकाने सांगितले की, तो स्वत: साठी नव्हे, तर स्वत: च्या मालकासाठी दारू खरेदी करण्यासाठी आला आहे. तसेच एका तरुणाने सांगितलं की, कोरोना संकट काळात सरकारकडे पैशांची कमतरता भासू नये, म्हणून तो अर्थव्यवस्थेला पाठिंबा देण्यासाठी दारू खरेदी करण्यासाठी आला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)