मदर डेअरीचे टोकन दूध 4 रुपयांनी स्वस्त, प्लास्टिक वापरावर जनजागृती करण्यासाठी कंपनीने लढविली आगळीवेगळी शक्कल
मदर डेअरीच्या प्रमुखांनी सांगितल्यानुसार, टोकन दुधाची विक्री अधिक व्हावी यासाठी कंपनीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या देशभरातून ठिकठिकाणी प्लास्टिक बंदी बाबत जनजागृती करण्यासाठी अनेक कार्यक्रम राबवताना दिसतायत. या मोहिमेला पाठिंबा दर्शवत मदर डेअरी (Mother Dairy) या नामांकित दूध उत्पादन कंपनीने देखील पुढाकार दर्शविली आहे. त्यासाठी आजपासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून मदर डेअरीने टोकन दूध सुरु केले असून हे दूध पॅकेट दुधाच्या तुलनेत 4 रुपयांनी स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे. मदर डेअरीच्या प्रमुखांनी सांगितल्यानुसार, टोकन दुधाची विक्री अधिक व्हावी यासाठी कंपनीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
प्लास्टिक वापरामुळे वाढणारे प्रदूषण रोखण्यासाठी सध्या युद्धपातळीवर प्लास्टिक बंदी विषयी विशेष मोहिम राबवली जात आहे. त्यात समाजाचा एक घटक म्हणून महत्त्वाची भूमिका राबवत मदर डेअरी या दूध उत्पादक कंपनीने टोकन दूधाची विक्री सुरु केली आहे. हे दूध पॅकेट दूधाच्या तुलनेत 4 रुपयांनी स्वस्त असल्या कारणाने ग्राहकांचा टोकन च्या दुधाकडे कल वाढेल परिणामी प्लास्टिक बंदीविषयी उत्तम जनजागृती होईल असे मदर डेअरीच्या प्रमुखांचे म्हणणे आहे.
हेही वाचा- Plastic Ban: प्लास्टिक वापरल्यास नागरिकांना 1 लाख रुपयांचा दंड
या प्रकारची मोहिम ही दिल्ली, गुरगाव, नॉयडा, फरिझाबाद आणि गाझियाबाद या शहरांमध्ये देखील राबवण्यात येणार आहे. कंपनी रिटेल सेल आऊटलेट्समध्ये वेंडिंग मशिनच्या माध्यमातून हा सुविधा देण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे मदर डेअरी टोकन दुधाची मागणी वाढणार आहे. याची पूर्वतयारी म्हणून कंपनीने दिवसाला 10 लाख लीटर दूध प्रति दिवस वाढवलं आहे. खूप मोठ्या संख्येत लोकं टोकन दूधाची खरेदी करतील यात शंका नाही.