Parliament Security Breach: संसदेच्या सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी 'मास्टरमाइंड' ललित झा अटक, चार जणांवर दहशतवादाचा आरोप
तो राजस्थानमध्ये कुठेतरी लपून बसल्याची बातमी आधी आली होती पण त्याने स्वतःचे पोलीस ठाणे गाठून स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले.
Parliament Security Breach: लोकसभेच्या सुरक्षा भंगाच्या घटनेचा मुख्य आरोपी ललित मोहन झा (Lalit Jha) याला गुरुवारी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर अटक करण्यात आली. ललित दुसऱ्या एका व्यक्तीसोबत कर्तव्यपथ पोलीस ठाण्यात पोहोचला, जिथे त्याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडे सोपवण्यात आले. ललित घटनेपासून फरार होता. ललित हा या घटनेचा मुख्य सूत्रधार असल्याचे बोलले जात असून त्याच्या शोधात पोलीस सातत्याने विविध ठिकाणी छापे टाकत होते.
संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी पाच आरोपींना अटक केली होती, परंतु ललितचा कोणताही सुगावा लागला नाही. तो राजस्थानमध्ये कुठेतरी लपून बसल्याची बातमी आधी आली होती पण त्याने स्वतःचे पोलीस ठाणे गाठून स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. तो कोणत्याही संघटनेशी संबंधित असल्याचा पुरावा आढळून आला नाही. (हेही वाचा -Suspended MPs Name Of Opposition: सभागृहात अडथळा आणलेप्रकरणी विरोधी पक्षांतील 15 खासदार संसदेतून निलंबीत, पाहा यादी)
आरोपी सागर शर्मा आणि मनोरंजन यांनी संसद भवनात जाण्यासाठी पासची व्यवस्था केली होती. हे सर्व आरोपी भगतसिंग फॅन क्लब या सोशल मीडिया ग्रुपशी संबंधित असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस सूत्रानुसार, सर्व आरोपी दीड वर्षापूर्वी म्हैसूर येथे भेटले होते. सागर जुलैमध्ये लखनौहून दिल्लीत आला होता, पण संसद भवनात प्रवेश करू शकला नाही. 10 डिसेंबर रोजी उर्वरित आरोपी आपापल्या राज्यातून दिल्लीत पोहोचले. त्यांनी संसद भवनात गुप्तपणे आक्षेपार्ह वस्तू नेल्या. (हेही वाचा - Derek O'Brien Suspended: राज्यसभेच्या सभापतींसोबत झालेल्या वादानंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन निलंबित)
दरम्यान, आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 120B, 453, 153, 186, 353 आणि UAPA च्या कलम 16 आणि 18 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.