Fire at Acropolis Mall: कोलकात्याच्या एक्रोपोलिस मॉलला भीषण आग, अनेकजण अडकल्याची भीती; 10 अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल

अग्निशमन विभागाचे अधिकारी मॉलमध्ये कार्यरत असलेल्या कार्यालयातून लोकांना बाहेर काढत आहेत. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आगीचे खरे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Fire at Acropolis Mall: कोलकात्याच्या एक्रोपोलिस मॉलला भीषण आग, अनेकजण अडकल्याची भीती; 10 अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल
Fire at Acropolis Mall (PC - X/@tamaghnaTOI)

Fire at Acropolis Mall: पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता (Kolkata) येथील एक्रोपोलिस मॉल (Acropolis Mall) मध्ये भीषण आग (Fire) लागली आहे. पोलीस-प्रशासनाच्या पथकासह अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी हजर झाल्या आहेत. आग लवकरात लवकर विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मॉलच्या आत बांधलेल्या कार्यालयांमध्ये अजूनही काही लोक अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अग्निशमन विभागाचे अधिकारी मॉलमध्ये कार्यरत असलेल्या कार्यालयातून लोकांना बाहेर काढत आहेत. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आगीचे खरे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमध्ये आग लागल्यानंतर लोक मॉलमधून बाहेर पळताना दिसत आहेत. (हेही वाचा -Kuwait Fire Tragedy: कुवेत आग दुर्घटनेतील 45 भारतीयांचे मृतदेह हवाई दलाच्या विशेष विमानाने भारतात रवाना)

पहा व्हिडिओ -

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी 11 जून रोजी कोलकाता येथील एका रेस्टॉरंटमध्ये भीषण आग लागली होती, ज्यामुळे स्थानिक लोकांमध्ये घबराट पसरली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या नऊ गाड्या घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.

(The above story first appeared on LatestLY on Jun 14, 2024 02:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).