Manoj Tiwari's Sister Passed Away: मनोज तिवारी यांच्या बहिणीचे निधन, सोशल मीडियावर व्यक्त केला शोक

याशिवाय त्याने आपल्या बहिणीचा एक फोटोही शेअर केला आहे. मनोज तिवारी यांची पोस्ट व्हायरल झाली असून अनेकजण त्यांचे सांत्वन करत आहेत.

Manoj Tiwari with Sister (PC - Twitter, Facebook)

Manoj Tiwari's Sister Passed Away: अभिनेता आणि खासदार मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांची बहीण माया यांचे बनारसमध्ये निधन झाले आहे. मनोज तिवारी यांनी सोशल मीडियावर ट्विट करून ही माहिती दिली आहे. याशिवाय त्याने आपल्या बहिणीचा एक फोटोही शेअर केला आहे. मनोज तिवारी यांची पोस्ट व्हायरल झाली असून अनेकजण त्यांचे सांत्वन करत आहेत. मनोज तिवारी यांनी ट्विट करून लिहिले की, 'माझी मोठी बहीण माया दीदी राहिली नाही, हे सांगताना मला खेद वाटत आहे. तिने आज वाराणसीत अखेरचा श्वास घेतला... देव तिला आपल्या चरणी स्थान देवो...'

मनोज तिवारी यांच्या पोस्टवर अनेक अभिनेते आणि राजकारण्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. यामध्ये तेजिंदर पाल बग्गा, शलभ मणी त्रिपाठी, शाहनवाज हुसेन, आशिष सूद आणि नवीन कुमार जिंदाल यांचा समावेश आहे. मनोज तिवारी यांच्या बहिणीच्या निधनाने संपूर्ण कुटुंब दु:खी आणि हादरले आहे. मनोज तिवारी यांच्या दिवंगत बहिणीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच सर्वजण प्रार्थना करत आहेत. (हेही वाचा - Kerala High Court on Woman’s Attire: महिलांचा पोशाख पुरुषाला तिचा विनयभंग करण्याचा परवाना देत नाही; केरळ उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिपण्णी)

मनोज तिवारी हे भोजपुरी कलाकार आहेत. त्यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्येही काम केले आहे. त्यांनी गायलेली गाणी चांगलीच व्हायरल होत आहेत. याशिवाय मनोज तिवारी हे भरतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. सामाजिक प्रश्नांवरही ते नेहमी आपले मत मांडत असतात.

दरम्यान, मनोज तिवारी यांचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत. ते अनेकदा त्याच्या चाहत्यांशी बोलतात. मनोज तिवारीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करतात. लवकरच ते अनेक चित्रपटांमध्येही दिसणार आहे. त्याने अनेक म्युझिक व्हिडिओही रिलीज केले आहेत.