Husband Kills Wife: किरकोळ वादातून पत्नीचे कापलेले शिर घेऊन पतीने चक्क पोलीस स्टेशनच गाठले; उत्तरप्रदेश येथील घक्कादायक घटना
किरकोर वादातून आपल्या पत्नीची शिर धडापासून वेगळे केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथील बादा (Banda) जिल्ह्यात आज घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरकोर वादातून आपल्या पत्नीची शिर धडापासून वेगळे केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथील बादा (Banda) जिल्ह्यात आज घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांनी आरोपीकडून हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र जप्त केले आहेत. तसेच मृत महिलेचे शरिर फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले आहे. आपल्या पत्नीचा शिर घेऊन चालातानाचा या पतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेने संपूर्ण बादा जिल्हा हादरून गेला आहे.
चिन्नार यादव असे हत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. चिन्नार हा आपली पत्नी विमला हिच्यासोबत बांदा जिल्ह्यातील नेता नगरमधील परिसरात राहत होता. मात्र, आज सकाळी किरकोर कारणांवरून दोघात वाद झाला. या वादातून चिन्नारने धारदार शस्त्राने आपल्या पत्नीच्या गळ्यावर वार केले. एवढ्या वरच न थांबता त्याने तिचे शिरच धडापासून वेगळे केले. त्यानंतर त्याने आपल्या पत्नीचे कापलेले शिर घेऊन जवळच्या पोलीस ठाण्यात पोहचला. हे पाहून स्वत: पोलीसदेखील चक्रावून गेले आहेत. हे देखील वाचा-Ambernath: मनसे विद्यार्थी सेना उल्हासनगर शहराध्यक्ष मनोज शेलार यांच्यावर तलवार हल्ला
उत्तरप्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी एका 19 वर्षीय तरुणीचा बलात्कार करून तिला मारहाण केली होती. त्यानंतर उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला होता. उत्तरप्रदेशमधील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढू लागल्याचे दिसत आहेत. यात वरील घटनेने आणखी भर टाकली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या संख्येत होणारी वाढ पाहता आंध्र प्रेदश सरकारप्रमाणे संपूर्ण देशात दिशा कायदा संमत करावा, अशा मगाणींनी जोर धरला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 09, 2020 03:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

