IPL Auction 2025 Live

Lockdown In India: लॉकडाऊन दरम्यान घरी पोहोचण्यासाठी पुछंमधील एका व्यक्तीने केलं मृत्युमुखी पडल्याचं नाटक; वाचा काय आहे नेमका प्रकार?

देशात आतापर्यंत 1200 हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात 21 दिवसांचे लॉकडॉऊन घोषित करण्यात आले आहे. परंतु, लोक तरीदेखील घरी जाण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या करत आहेत. या लॉकडाऊन दरम्यान जम्मूमधील पुंछमध्ये एका व्यक्तीने घरी जाण्यासाठी चक्क स्वत: च्या मृत्यूचं बनावट प्रमाणपत्र तयार करत रुग्णवाहिकेने प्रवास केला आहे.

(Photo Credits: IANS)

सध्या संपूर्ण देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. देशात आतापर्यंत 1200 हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात 21 दिवसांचे लॉकडॉऊन घोषित करण्यात आले आहे. परंतु, लोक तरीदेखील घरी जाण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या करत आहेत. या लॉकडाऊन दरम्यान जम्मूमधील पुंछमध्ये (Poonch) एका व्यक्तीने घरी जाण्यासाठी चक्क स्वत: च्या मृत्यूचं बनावट प्रमाणपत्र (Death Certificate) तयार करत रुग्णवाहिकेने प्रवास केला आहे.

या व्यक्तीने गावी पोहचण्यासाठी चक्क स्वतःच्याच मृत्यूचा बनाव कट रचला. परंतु, पुंछ येथे सुरनकोट येथे पाहऱ्यावर तैनात असलेल्या पोलिसांना एक अँबुलन्स येताना दिसली. पोलिसांनी या अँबुलन्सची तपासणी केली. यावेळी पोलिसांना अँबुलन्समध्ये तिघेजण एक मृतदेह नेत असल्याचे दिसले. पोलिसांनी या घटनेची कसून तपासणी केली. दरम्यान, पोलिसांना सदर व्यक्ती जिवंत असल्याचे समजले. (हेही वाचा - कर्नाटक येथील मेडिकलच्या दुकानातून तब्बल 10 लाख रुपये किंमतीचे बनावट 70 थर्मामीटर्स जप्त)

मृत्यूचं सोंग करणाऱ्या या व्यक्तीचं नाव हमाक दिन असं आहे. हमाकला उपचारासाठी सरकारी वैद्यकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातून डिस्जार्ज मिळाल्यानंतर आपल्या मूळ घरी परतण्यासाठी त्यांने रुग्णालयातील 3 जणांना लाच देऊन स्वत:च्या मृत्यूचं खोटं प्रमाणपत्र तयार केलं.