IPL Auction 2025 Live

Karnataka Shocker: खेळता खेळता मित्राने घेतला जीव, मित्राच्या प्रायव्हेट पार्टमध्ये घुसवला ड्रायर; नोझल टाकून भरली गरम हवा, तरुणाचा मृत्यू

त्यामुळे तरुणाची आतडी फुटली आणि त्याचा मृत्यू झाला.

Dryer, Death प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Pixabay)

Karnataka Shocker: बेंगळुरू (Bengaluru) मध्ये एका व्यक्तीच्या मृत्यूची एक विचित्र घटना समोर आली आहे. गंमत म्हणून मित्राने आपल्याच मित्राच्या गुदद्वारात (Recutm) इलेक्ट्रिक ब्लो-ड्रायरची नोझल (Nozzle of Blow Dryer) टाकली आणि ती फुगवली. त्यामुळे तरुणाची आतडी फुटली आणि त्याचा मृत्यू झाला. 25 मार्च रोजी पीडित योगेश (वय, 24) हा त्याचा मित्र मुरली (वय, 25) याला भेटण्यासाठी बेंगळुरूच्या सॅम्पीगेहल्ली भागातील बाईक सर्व्हिस सेंटरमध्ये गेला असताना ही घटना घडली. मुरली सर्व्हिस सेंटरमध्ये काम करतो.

मित्राच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकला ड्रायर -

प्राप्त माहितीनुसार, बेंगळुरूच्या सीएनएस बाइक सर्व्हिस सेंटरमध्ये योगेश मुरलीला भेटला. योगेश दुचाकी धुण्यासाठी आला होता. सर्व्हिस सेंटरमध्ये काम करणारा मुरली योगेशला ओळखत होता. वॉशिंग पूर्ण केल्यानंतर, मुरलीने वाहने सुकविण्यासाठी उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक ब्लो-ड्रायरसह खेळण्यास सुरुवात केली. (हेही वाचा - 10 वर्ष तरूणी खात होती स्वतःचेच केस, जे जे हॉस्पिटल्स मध्ये 22 वर्षीय तरूणीच्या पोटातून काढला 770 ग्रॅम केसांचा बोळा)

दरम्यान, मुरलीने सुरुवातीला योगेशच्या चेहऱ्यावर आणि पाठीवर ब्लो-ड्रायर लावले आणि नंतर ड्रायरची नोझल योगेशच्या गुदद्वारात घातली. योगेशच्या पोटात गरम हवा गेल्याने त्याचे पोट फुगले. त्यामुळे तो जमिनीवर पडला. योगेश पडल्याने मुरली घाबरला आणि जवळच्या लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेले, तिथे डॉक्टरांच्या लक्षात आले की ब्लो-ड्रायरच्या हवेच्या दाबामुळे योगेशच्या आतड्याला गंभीर इजा झाली आहे. (वाचा -IND vs AUS 2nd T20: नागपूरातील खेळपट्टी सुकविण्यासाठी हेअर ड्रायरचा केला वापर? जाणून घ्या यामागील सत्यता)

योगेशवर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, यात त्याचा मृत्यू झाला. योगेश हा विजयपुरा येथील रहिवासी होता. योगेश बेंगळुरूमध्ये डिलिव्हरी एजंट म्हणून काम करत होता. तो थानिसांद्रामध्ये त्याच्या आजीसोबत राहत होता. याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 304 अंतर्गत संपीगेहल्ली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुरलीला अटक करण्यात आली आहे.