IPL Auction 2025 Live

सरकारने GST नियमात केले मोठे बदल; लघु व मध्यम उद्योजाकांना मिळणार दिलास

आता नवीन नियमानुसार जर तुमचे वार्षिक उत्पन्न 40 लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला कोणत्याही रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही

अरुण जेटली (Photo Credit-PTI)

देशातील लघु व मध्यम उद्योजकांना  मोदी सरकारने फार मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने आता अशा लघु आणि मध्य उद्योगांचा जीएसटी (GST) कराचा परीघ वाढवला आहे. आता नवीन नियमानुसार जर तुमचे वार्षिक उत्पन्न 40 लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला जीएसटी करामधून सवलत मिळणार आहे. याआधी सवलतीचा हा नियम 20 लाख वार्षिक उत्पन्न असेल तर लागू होत होता. नुकतीच 32 वी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषद (GST Council) बैठक पार पडली, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीनंतर वित्तमंत्री अरुण जेटली (Arun Jaitley) यांनी ही घोषणा केली. (हेही वाचा : Budget 2019 : मोदी सरकारकडून मध्यमवर्गीयांना मिळू शकते ही भेट)

सरकारच्या या निर्णयाचे तळागाळातून स्वागत करण्यात येत आहे. या नव्या नियमामुळे आता जीएसटी सूट 40 लाखांपर्यंत गेल्याने लघु व मध्यम उद्यागांना याचा नक्कीच फायदा होईल. याचसोबत सरकारने जीएसटी संरचना योजने (GST Composition Scheme) चीही सीमा वाढवून ती 1.5 कोटी इतकी केली आहे, आधी ती 1 कोटी इतकी होती. तसेच या स्कीममध्ये येणाऱ्या कंपन्यांना प्रत्येक तिमाहीमध्ये कर भरावा लागणार आहे. मात्र, कर परतावा वर्षातून एकदाच भरावा लागणार आहे.