IPL Auction 2025 Live

Mahesh Baghel: मृत्यूनंतर अर्ध्या तासाने भाजप नेते महेश बघेल झाले जिवंत, डॉक्टरांनी केले होते मृत घोषित

डॉक्टर त्याची काळजी घेत आहेत. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Mahesh Baghel

कधी कधी काही घटनांमुळे आपल्याला आश्चर्याचा झटका बसतो. आता असेच एक प्रकरण उत्तर प्रदेशातील आग्रा येथे पाहायला मिळाले आहे. येथे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेश बघेल यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. नातेवाइकांनी त्याला घरी नेऊन शोक व्यक्त केला, तसेच त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी देखील केली पंरतू काही वेळाने महेश बघेल हे जिवंत झाल्याने सर्वाना धक्का बसला. आता या प्रकरणाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.  (हेही वाचा - Rahul Gandhi: राहुल गांधींचे संसद सदस्यत्व बहाल, लोकसभा सचिवालयाकडून अधिसूचना जारी)

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेश बघेल यांची प्रकृती खालावली होती. यानंतर त्यांना उपचारासाठी न्यू आग्रा येथील महेश बघेल पुष्पांजली रुग्णालयात दाखल करण्यात आले. महेश बघेल यांना रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर कुटुंबीय महेश बघेल यांच्यासह सराई ख्वाजा यांच्या घरी पोहोचले. इकडे कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली होती, त्यानंतर अचानक महेश बघेल यांनी डोळे उघडले आणि शरीराच्या हालचाली सुरू केल्या. अशा स्थितीत लोकांनी त्याला रुग्णालयात नेले. आता भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेश बघेल रुग्णालयात दाखल आहेत. डॉक्टर त्याची काळजी घेत आहेत. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

महेश बघेल यांना डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतरच लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली होती. रडून कुटुंबीयांचीही दुरवस्था झाली होती पण आता ते जिवंत झाल्यानंतर सर्वजण आनंदी आहेत. सध्या महेश बघेल यांना छातीत संसर्ग झाला असून त्यांची तपासणी करण्यात येत आहे.