धक्कादायक : HIV बाधित राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक

2017 मध्ये देशातील 21 लाख 40 हजार लोकांना HIVची लागण झाली आहे, ज्यामध्ये जवळ जवळ 40 टक्के महिलांचा समावेश आहे.

(Photo Credits: LubricityforDryMouth/Twitter)

राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेने (नाको) नुकत्याच पब्लिश केलेल्या एका अहवालातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. 2017 मध्ये देशातील 21 लाख 40 हजार लोकांना HIVची लागण झाली आहे, ज्यामध्ये जवळ जवळ 40 टक्के महिलांचा समावेश आहे. रिपोर्टनुसार दरवर्षी 60 टक्क्यांनी हे प्रमाण घटत होते मात्र 2000 ते 2017 दरम्यान हे प्रमाण फक्त 27 टक्क्यांनी घटले आहे. 2020 पर्यंत घटण्याचे प्रमाण 75 टक्क्यांपर्यंत पोहोचणे अपेक्षित होते मात्र सध्याची आकडेवारी पाहता त्या लक्ष्यापर्यंत पोहोचणे अवघड आहे.

मागील वर्षी 87,580 इतक्या नवीन लोकांना HIVची लागण झाली होती तर, 69,110 इतके लोक एड्सशी संबंधित आजारांनी मृत्यू पावले होते. तसेच 22,677 इतक्या HIV बाधित मातांनी मुलांना जन्म दिले होते.  या रिपोर्टमध्ये अशा राज्यांचा उल्लेख आहे, ज्यांमध्ये HIVची लागण होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे, आणि हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा राज्यांमध्ये अरुणाचल प्रदेश, आसम, मिझोरम, मेघालय आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश होतो. तर छत्तीसगड, दिल्ली, जम्मू-काश्मीर, मणिपूर आणि नागालँड या ठिकाणी हे प्रमाण सर्वात कमी असल्याचे आढळून आले आहे.

रिपोर्टनुसार, वेश्या, ट्रान्सजेंडर, ड्रग्जचे सेवन करणारे लोक तसेच असे पुरुष जे पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवतात यांमध्ये HIVचे प्रमाण अधिक दिसून येते. यामुळे 2005 पासून एड्समुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 71 टक्क्यांनी वाढ झालेली आहे.

तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र सर्वात जास्त HIV बाधील लोक असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा पहिला नंबर लागतो. महाराष्ट्रामध्ये HIVबाधित लोकांची संख्या ही जवळ जवळ 3.30 लाख इतकी आहे. हे प्रमाण देशामधील HIV बाधित लोकांच्या 15 टक्के इतके आहे. महाराष्ट्रानंतर आंध्र प्रदेश (2.70 लाख), कर्नाटक (2.47 लाख) आणि तेलंगना (2.04 लाख) या राज्यांचा नंबर लागतो.

वैद्यकीय उपचाराने एड्स आटोक्यात राहत असला तरी, या रोगावर अजून तरी कोणताही जालीम उपाय सापडला नाही. त्यामुळे आपल्यापरीने सर्व प्रकारची काळजी घेऊन या रोगावर नियंत्रण मिळवणे हाच मोठा उपचार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif