IPL Auction 2025 Live

गर्भवती महिलेला दिले HIV संक्रामित रक्त, रक्तदात्याने केली आत्महत्या

कारण तरुणाच्या शरीरातून या महिलेला अशा पद्धतीचे रक्त दिल्याने धक्का बसल्याने असे केले असल्याचे सत्य समोर आले आ

फोटो सौजन्य- फाइल इमेज

तमिळनाडू येथे एका गर्भवती महिलेला एचआयव्ही (HIV) संक्रामित रक्त दिल्याने रक्तदान करणाऱ्या तरुणाने आत्महत्या केली आहे. कारण तरुणाच्या शरीरातून या महिलेला अशा पद्धतीचे रक्त दिल्याने धक्का बसल्याने असे केले असल्याचे सत्य समोर आले आहे.

रक्तदान केलेल्या तरुणाला दोन वर्षांपूर्वी एका रक्तदान शिबिरात रक्त देण्यास गेला होता. त्यावेळी त्याचे रक्त एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. परंतु तेथील वैद्यकिय डॉक्टरांनी या गोष्टीकडे कानाडोळा करत त्याच्या शरीरीतील रक्त काढले. दुसऱ्यावेळेस सत्तुर जिल्ह्यातील रुग्णालयातही डॉक्टरांना त्याला एचआयव्ही आहे असे माहिती असूनही रक्त काढून घेतले. तसेच त्या तरुणाच्या रक्ताच्या पिशवीवर सुरक्षित रक्त असे लिहिले गेले. त्यानंतर या तरुणाचे रक्त रुग्णालयातील गर्भवती महिलेला दिले गेले. त्यामुळे महिला आणि तिच्या बाळास एचआयव्ही पॉझिटिव्हची लागण झाली होती.

या प्रकरणी तरुणाला तो एचआयव्ही  पॉझिटिव्ह असल्याचे कळले तेव्हा त्याला धक्का बसला. गर्भवती महिलेच्या प्रसुतीनंतर चार दिवसांनी या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.