ग्वालियर: कारागृहातील कैद्याने स्वत:चे गुप्तांग कापून ठेवले मंदिरात; पाहा पुढे काय घडले?

खून प्रकरणात दोषी ठरलेल्या एका 25 वर्षीय कैद्याने कारागृहातच स्वताचे गुप्तांग कापल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना आज सकाळी मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) ग्वालियर मध्यवर्ती कारागृहात (Central Jail Gwalior) घडली आहे.

ग्वालियर: कारागृहातील कैद्याने स्वत:चे गुप्तांग कापून ठेवले मंदिरात; पाहा पुढे काय घडले?

खून प्रकरणात दोषी ठरलेल्या एका 25 वर्षीय कैद्याने कारागृहातच स्वताचे गुप्तांग कापल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना आज सकाळी मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) ग्वालियर मध्यवर्ती कारागृहात (Central Jail Gwalior) घडली आहे. कैद्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर जयारोग रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कैद्याला सोमवारी रात्री झोपेत स्वप्न पाहिले होते. त्यानंतर या कैद्याने हे धक्कादायक कृत्य केले असल्याची माहिती, ग्वालियर मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक मनोज साहू यांनी दिली आहे. कारागृहात घडलेला प्रकार समजल्यानंतर ग्वालियर परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

विष्णु कुमार असे 25 वर्षीय आरोपीचे नाव आहे. खून प्रकरणात दोषी ठरलेला विष्णुला अजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती. विष्णू हा 2018 सालापासून ग्वालियर मध्यवर्ती तुरुंगात कैद आहे. मात्र, विष्णुने मंगळवारी सकाळी 6.30 वाजता कारागृहातील भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन पुजा केली. त्यानंतर काहीच क्षणात मंदिरातून विष्णु याचा ओरडण्याचा आवाज आला. यामुळे काही कैदी आणि जेल वार्डन यांनी मंदिराकडे धाव घेतली. त्यावेळी विष्णु याने आपले गुप्तांग कापून मंदिरापुढे ठेवल्याचे त्यांना समजले. त्यानंतर विष्णुला उपचारासाठी कैद्यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती, मनोज साहू यांनी दिली आहे. हे देखील वाचा- Bois Locker Room Case: मुलींबाबत अश्लील टिपण्णी, Gang Rape बाबत चॅट्स व्हायरल होताच Instagram ग्रुप मधील 15 वर्षीय मुलाला दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात

मिळालेल्या माहितीनुसार, विष्णुला सोमवारी रात्री एक स्वप्न पडले होते. त्यावेळी त्यांच्या स्वप्नात येऊन भगावान शंकरने त्याला दर्शन दिले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी विष्णुने चमच्या साहाय्याने आपले गुप्तांग कापून मंदिराच्या समोर ठेवले.

(The above story first appeared on LatestLY on May 05, 2020 04:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).