भोपाळमध्ये Premium Petrol Price ने शंभरी गाठल्याने तरूणाने बॅट, हेल्मेट उंचावत अनोख्या अंदाजात नोंदवला निषेध; फोटो व्हायरल
यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. कोरोना माहामारीमुळे आधीच आर्थिक तंगीत आलेल्या सर्वसामन्यांच्या खिशावर मोठा ताण पडत आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol And Diesel Prices) किंमतीत गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने वाढ होताना दिसत आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. कोरोना माहामारीमुळे आधीच आर्थिक तंगीत आलेल्या सर्वसामन्यांच्या खिशावर मोठा ताण पडत आहे. यातच मध्यप्रदेशच्या (Madhya Pradesh) भोपाळमध्ये (Bhopal) पेट्रोलच्या किंमतीने शंभरी गाठल्याने एका तरूणाने अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला आहे. या तरूणाने पेट्रोल पंपावर जाऊन क्रिकेट स्टाईलने या किंमतीचा निषेध नोंदवला आहे. या तरूणाचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच या फोटोवर अनेकजण गंमतीशीर कंमेंटदेखील देत आहेत.
जागतिक बाजारपेठेतील तेजीमुळे स्थानिक शहरांमध्ये कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे भाव वाढवले गेले आहेत. पेट्रोलच्या किंमतीत गेल्या सात दिवसात 2.08 रुपयांची वाढ झाली आहे. महत्वाचे म्हणजे, फेब्रुवारी महिन्यात डिझेलच्या किंमतीमध्ये 2.58 रुपये आणि पेट्रोलमध्ये 2.43 रुपये प्रतिलिटर वाढ झाली आहे. हे देखील वाचा- नोकरदार वर्गासाठी दिलासादायक बातमी! ऑफिसमध्ये 15 मिनिटांपेक्षा जास्त काम केल्यास मिळणार ओव्हरटाईम? सरकारचा नवा नियम
ट्वीट-
ट्वीट-
ट्वीट-
ट्वीट-
यावर्षी आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर चार रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान, जागतिक तेलाच्या बेंचमार्क ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 60 च्या पुढे गेली आहे, जी मागील वर्षातील सर्वाधिक आहे.